IND vs ENG: भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा विकेटकिपर फलंदाज जोस बटलर संघाबाहेर गेला आहे. चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडचा ऑलराउंडर क्रिस वोक्स संघात परतणार आहे. बटलर आपल्या खाजगी कारणासाठी पुढील सामना खेळणार नाही. बटलरच्या घरी नवा पाहुणा येणार असल्यानं तो मालिकेतून बाहेर पडला आहे. बटलरच्या जागी आता जॉनी बेयरस्टो विकेटकीपिंग करेल. तर सॅम बिलिंग्सला कव्हरच्या रुपात संघात प्रवेश मिळाला आहे.  

Continues below advertisement


Yogesh Kathuniya : बहादूरगडचा 'बहाद्दर', नवव्या वर्षी पॅरालाइज, 24 व्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक, योगेशचा थक्क करणारा प्रवास


क्रिस वोक्सनं आपला शेवटचा कसोटी सामना मागील वर्षी ऑगस्टमध्ये खेळला होता.  त्याला शिडीवरुन पडल्यानं दुखापत झाली होती. आता तो तंदुरुस्त झाला आहे. 


भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकला आहे. तर पहिला सामना अनिर्णित झाला होता.



चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचं 16 खेळाडूंचं स्क्वॉड 


रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कप्तान), डेन लॉरेन्स, जॉनी बेयरिस्टो (विकेटकीपर), मोईन अली, सैम कर्रन, क्रेग ओवर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन, ओली पोप, सैम बिलिंग्स, मार्क वुड और क्रिस वोक्स.   


इंग्लंड क्रिकेट संघाने तिसऱ्या कसोटीत  लॉर्ड्सवरील पराभवाचा बदला घेतला. हेडिंग्ले लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 78 धावात गुंडाळलं. यानंतर इंग्लंडने त्यांच्या फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या डावात 432 धावा केल्यावर 354 धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवशी झुंज देणाऱ्या टीम इंडियाने चौथ्या दिवशी शस्त्रे म्यान केली. संपूर्ण संघ अवघ्या 278 धावांवर बाद झाला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.