Yogesh Kathuniya : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती.
Yogesh Kathuniya : पॅरालिम्पिकमध्ये योगेश कठुनियाची कमाल, थाळीफेकमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्यपदक
हरियाणाच्या रोहतकजवळील बहादूरगडच्या योगेशनं नवा इतिहास रचला आहे. योगेशनं आतापर्यंत सहा मुख्य स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. बहादूरगडच्या राधा कॉलनीत राहणारा योगेश. 1997 मध्ये जन्मलेला योगेशचे हात आणि पाय 2006 मध्ये पॅरालाईज झाले. काही काळानंतर हात ठीक झाले. 2017 मध्ये दिल्ली विद्यापीठात शिकत असताना त्याचा मित्र सचिन यादवनं त्यांना खेळात भाग घ्यायला लावला.
योगेशला डिस्कस थ्रो अर्थात थाळीफेमध्ये आपण काहीतरी करु शकतो असा विश्वास निर्माण झाला आणि त्यानं तयारी सुरु केली. त्याची आई मीना आणि वडील ज्ञानचंद यांनी त्याच्या प्रयत्नाना उभारी दिली आणि आज योगेशनं आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळवला.
Paralympic 2020 : भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं रौप्य तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर कोरलं आपलं नाव
डिस्कस थ्रोमध्ये योगेशची कामगिरी
-2018 - पंचकूलामध्ये हुई राष्ट्रीय डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक
-2018 - बर्लिनमध्ये हुई ओपन ग्रेंड प्रिक्स डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक
-2018 - इंडोनेशियामध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये चौथे स्थान
-2019 - फरीदाबादमध्ये राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक
-2019 - पॅरिसमध्ये ओपन ग्रँड प्रिक्स डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक
-2019- दुबईमध्ये वर्ल्ड डिस्कस थ्रो चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक
-2021 - बंगळुरुमध्ये राष्ट्रीय डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक