Janmashtami 2021 : आज जन्माष्टमी, म्हणजेच कृष्णजन्म. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहानं हा सण साजरा केला जातो. मंदिारांपासून अगदी घराघरांत श्रीकृष्णाच्या जन्मासाठी विशेष तयारी केली जाते. जन्माष्टमीचा उत्सव देशात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या निमित्तानं घरांतही श्रीकृष्णाच्या बालरुपाची पूजा केली जाते. तसेच जन्मोत्सवासाठी कृष्णाच्या पाळण्याला आकर्षक सजावट केली जाते. या दिवशी उपवास ठेवून श्रीकृष्णाची पूजा केली जाते. पंचागानुसार, या वर्षीची जन्माष्टमी काहीशी खास आहे. कारण यंदा जन्माष्टमीला एक विशेष योग जुळून आला आहे. 


2021 ची जन्माष्टमी कधी आहे? 


पंचागानुसार, 30 ऑगस्ट 2021, सोमवार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. 


श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला होता?


पुराणानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि बुधवारी झाला. भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णुचा आठवा अवतार आहे. 


जन्माष्टमीच्या दिवशी विशेष योग 


वर्ष 2021 म्हणजेच, यंदाच्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा योग जुळून आलाय, जसा द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी बनला होता. पंचागानुसार, यंदाच्या वर्षीही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी भाद्रपद महिन्याची अष्टमी तिथी, कृष्ण पक्ष आणि रोहिणी नक्षत्र अशा एकत्र योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाची जन्माष्टमी विशेष आहे. जन्माष्टमीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मनोभावे भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णाला 16 कलांचा स्वामी म्हटलं जातं. या दिवशी श्रीकृष्णाचं व्रत करुव विधीवत पूजा करावी. यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 


निशिता पूजेची वेळ : रात्री 11.59 पासून सकाळी 12.44 पर्यंत (31 ऑगस्ट 2021)