England vs India 3rd Test : भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या हेंडिग्ले येथे तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस २ बाद 215 धावांपर्यंत भारताने मजल मारली. वातावरण खराब असल्याने आजचा सामना वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. चेतेश्वर पुजारा 15 चौकारांसह 91 तर विराट कोहली 6 चौकारांसह 45 धावांवर नाबाद होते.
भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुलची क्रेग ओव्हर्टनने आठ धावांवर तंबूचा मार्ग दाखवला. तर रोहित शर्माने 156 बॉलमध्ये 59 धावा केल्या. ओली बॉबिन्सन रोहित तंबुत माघारी धाडले. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत 99 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर पुजाराचे अर्धशतक झाले.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लडने भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पहिल्या डावात 432 धावा करत 354 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात फक्त 78 धावा केल्या आहेत. कर्णधार जो रूट 165 बॉलमध्ये 121 धावा केल्या आहे. त्यामुळे इंग्लंडने भारतासमोर 432 उभारल्या आहे. इंग्लंडने आज 8 बाद 423 धावांपुढे खेळण्यास सुरूवात केली. क्रेग ओव्हर्टनने 24 धावा केल्या. शमीने ओव्हर्टनला आणि बुमराहने रॉबिन्सनला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. इंग्लंडकडून रुट शिवाय अलवावा डेविड मलानने 70, हसीब हमीदने 68, रोरी बर्न्सने 61, जॉनी बेयरस्टोने 29, क्रेग ओवरटनने 32, सॅम कर्रनने 15, मोइन अली ने आठ, जोस बटलरने सात धावा केल्या. ओली रॉबिंसन आणि जेम्स एंडरसन एकही धाव न करता तंबूत परतले.
संबंधित बातम्या :
IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम तर इंग्लंडची वाटचाल मोठ्या आघाडीकडे