Eye Care Tips : प्रत्येक महिलेला (Women) मेकअप करायला खूप आवडतं. चेहऱ्याप्रमाणेच डोळ्यांचा (Eyes) मेकअपही अनेक महिला अगदी हौशीने करतात. यासाठी मॅट आणि मिनिमलपासून ते ग्लोसीपर्यंत असे कित्येक ट्रेंडिंग मेकअपचे लूक महिला सतत फॉलो करत असतात. इतकंच नाही तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी महिला सतत मेकअपचे नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. मात्र, काही महिलांचे डोळे फार सेन्सिटिव्ह (संवेदनशील) असतात. अशा महिलांनी मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 


काही लोकांना घाईघाईत मेकअप करण्याची सवय असते. अनेक लोक तर हात न धुता मेकअप करतात. त्यामुळे आपल्या हातातील जंतू डोळ्यांत जाण्याचा धोका असतो. अशा वेळी हात धुतल्यानंतरच डोळ्यांचा मेकअप करणं जास्त गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह डोळ्यांच्या (Sensitive Eyes) मेकअपमुळे त्याचा विपरित परिणाम तुमच्या डोळ्यांवर पडतो. तर, तुमचे डोळे जरी सेन्सिटिव्ह असले तरी काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे डोळे अधिक सुंदर बनवू शकता. 


पावडर प्रोडक्ट 


संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिलांनी डोळ्यांचा मेकअप करताना कमीत कमी पावडरचा वापर करावा. याऐवजी तुम्ही डोळ्यांना क्रिम देखील लावू शकता. डोळ्यांवर पावडर लावल्याने ती डोळ्यांमध्ये जाण्याची भीती असते. अशा पावडरमध्ये केमिकलचा वापर जास्त केला जातो. ज्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.


मेकअप काढताना तो नीट काढा 


काहीजण रात्री झोपताना चेहऱ्याचा तर मेकअप काढतात पण डोळ्यांचा मेकअप न काढता तो तसाच ठेवून झोपतात. असे केल्याने तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही मेकअप करून झोपलात तर त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. मेकअप करून झोपल्याने डोळ्यांची ॲलर्जी देखील होऊ शकते. म्हणून, झोपण्यापूर्वी, नेहमी कॉटन बड्स वापरून डोळ्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून मेकअप पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे तुमच्या डोळ्यांचे रक्षण होईल.


ब्रशची काळजी घ्या


मेकअप करताना नेहमी तुम्ही कोणत्या प्रकारचा ब्रश किंवा स्पंज वापरत आहात हे लक्षात ठेवा. चांगल्या क्वालिटीचा स्पंच वापरा. वाईट प्रतीचा ब्रश वापरल्यामुळे तुम्हाला स्किनची एॅलर्जी देखील होऊ शकते.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेचा 'Digital Detox' आहे तरी काय? वाचा याचे भन्नाट फायदे