Raghuram Rajan on Indian Economy: नवी दिल्ली : जर भारताला विकसित देश बनवायचं असेल, तर देशाचा आर्थिक वार्षिक दर (Indian Economic Grwoth) 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवावा लागेल. तरच, भारत 2047 पर्यंत विकसित देश होईल, असं वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Former RBI Governor Raghuram Rajan) यांनी केलं आहे. नुकत्याच कोलकाता येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना रघुराम राजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 7 टक्के वाढीच्या दरानं, भारताचं दरडोई उत्पन्न सध्याच्या 2,400 डॉलर (जवळपास 2 लाख रुपये) वरुन वाढून 2047 मध्ये 10 हजार डॉलर (8.3 लाख रुपये) पर्यंत वाढेल.     


रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी अर्थतज्ज्ञ रोहित लांबा यांच्यासोबत 'ब्रेकिंग द मोल्ड: रीइमेजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर' हे पुस्तक लिहिलं आहे. याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान बोलताना रघुराम राजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था (Develop Economy) बनण्यासाठी भारताला शिक्षण आणि आरोग्य सेवेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही रघुराम राजन यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भारतानं गेल्या 25 वर्षांपासून विकास दर 6 टक्के राखला आहे, जो कोणत्याही देशासाठी सोपा नाही. 


शिक्षण, आरोग्यावर भर देण्याची गरज 


रघुराम राजन बोलताना म्हणाले की, भक्कम पाया उभारण्यासाठी प्रशासन सुधारणांसोबतच शिक्षण आणि आरोग्य सेवेवर  (Education and Health Service)  भर देण्याची गरज आहे. भारताच्या विकासाची भविष्यातील दिशा ठरवण्यावर त्यांनी भर दिला. देशाला सध्या लाभत असलेला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश 2050 नंतर कमी होईल, हे लक्षात घेता. सर्व विभागांचा समतोल विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 


6 टक्क्यांहून अधिक वाढीची गरज


रघुनाथ राजन म्हणाले की, सध्या वरच्या स्तरावर उत्पन्न वाढत आहे. राजन आणि लांबा या दोघांनीही भारतात उच्च-किंमतीची उत्पादनं तयार करण्यावर आणि व्यवसायाला पाठिंबा देण्याला महत्त्व दिलं आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की, 2047 पर्यंत भारताचा विकास दर 6 टक्के राहिला तर ते अजूनही निम्न मध्यम अर्थव्यवस्थाच राहील.                                         


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Union Budget 2024 : मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा? नव्या अर्थसंकल्पात 4 कर सवलती मिळण्याची अपेक्षा