IND vs ENG 1st Test : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी दारुण पराभव केलाय. ओली पोपची 196 धावांची खेळी आणि टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लडने हा विजय मिळवला. इंग्लंडने भारतापुढे विजयसाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या. भारताकडून (IND vs ENG 1st Test) दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने कडवी झुंज दिली. मात्र, इतर खेळाडूंना फलंदाजी करताना मोठे योगदान देता आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कमाल दाखवता आली नाही. 


भारताने पहिला आणि दुसरा दिवस नावावर केल्यानंतर ओली पॉपने बाजी पलटली 


नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी उतरला होता. पहिल्या डावात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या 70 धावांच्या खेळीच्या जोरावर 246 धावा केल्या. भारताकडून जाडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स पटकावल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताने पहिल्या डावात 436 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजाने आक्रमक फलंदाजी केली होती. 


कसोटीतील पहिला आणि दुसरा दिवस भारताने आक्रमक खेळ करुन आपल्या नावावर केला होता. मात्र, तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ओली पोपने बाजी पलटली. त्याने भारताने घेतलेली सर्व आघाडी स्वत:च्या खेळीच्या जोरावर मोडून काढली. ओली पोपने 278 चेंडूमध्ये 196 धावा केल्या. त्याच द्विशतक केवळ 4 धावांनी हुकले. 


चौथ्या दिवशी इंग्लंडची कमाल, भारताचा डाव गडगडला 


चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने मैदानात कमाल करुन दाखवली. भारतापुढे विजयसाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या आणि भारताचा 28 धावांनी पराभव झाला. भारताकडून सुरुवातीला रोहित शर्माने फटकेबाजी केली. त्यानंतर 8 व्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने कडवी झुंज दिली. मात्र, टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने हा विजय मिळवला. 






 


इतर महत्वाच्या बातम्या 


AUS vs WI 2nd Gabba Test : वेस्ट इंडिजने रचला इतिहास, 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली; ब्रायन लारा, कार्ल हुपरच्या डोळ्यात आनंदाश्रु!