AUS vs WI 2nd Gabba Test : वेस्ट इंडिजने तब्बल 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटीत पराभूत करून इतिहासाची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबावर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजकडून मालिकेत पदार्पण करणाऱ्या शामर जोसेफने शेवटची विकेट घेत आपल्या संघाला विजयाकडे नेले.






दुसऱ्या डावात 9 विकेट्स गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला 1 विकेट शिल्लक असताना विजयासाठी 9 धावांची गरज होती, परंतु वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाला विजयाची रेषा ओलांडू दिली नाही. जोसेफने फलंदाजी करणाऱ्या जोश हेजलवूडला बाद करून संघाला विजय मिळवून दिला.






ऑस्ट्रेलियाला 216 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही


वेस्ट इंडिजला त्यांच्या दुसऱ्या डावात 193 धावा करता आल्या, त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या डावात शामर जोसेफला फलंदाजी करताना पायाच्या बोटाला दुखापत झाली, त्यानंतर तो निवृत्त झाला आणि पाहुण्या वेस्ट इंडिजचा डाव संपला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 207 धावांत गुंडाळले आणि सामना जिंकला. यादरम्यान सलामीवीर स्टीव्ह स्मिथने 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने संघासाठी नाबाद 91 धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने 4 चौकारांसह 42 धावा केल्या. पण याशिवाय सर्व फलंदाज फ्लॉप ठरले आणि नाबाद असलेल्या स्टीव्ह स्मिथला कोणीही साथ देऊ शकले नाही.






मालिकेत पदार्पण करणारा शमर जोसेफ ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'


शमर जोसेफने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जोसेफ आपली दुसरी कसोटी खेळत होता, त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि एकूण 8 बळी घेतले. पहिल्या डावात 1 बळी आणि दुसऱ्या डावात 7 बळी घेत त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त केली. या चमकदार कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.






इतर महत्वाच्या बातम्या