एक्स्प्लोर

INDvsAUS : पर्थ कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं. पण कांगारुंनी चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाची पाच बाद 112 अशी दाणादाण उडवली

पर्थ  : विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पर्थ कसोटीत पराभवाच्या छायेत आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं आहे. पण कांगारुंनी चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाची पाच बाद 112 अशी दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकायची तर भारतीय संघाला अजूनही 175 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत नऊ, तर हनुमा विहारी 24 धावांवर खेळत होता. भारताच्या दुसऱ्या डावात पाचही प्रमुख फलंदाजांनी सपशेल निराशा केली. लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. विराट कोहली आणि मुरली विजयलाही मोठी खेळी उभारता आली नाही. अजिंक्य रहाणेनं केलेली 30 धावांची खेळीही भारताचा पराभव टाळण्यासाठी पुरेशी नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि जोश हेझलवूडनं प्रत्येकी दोन तर मिचेल स्टार्कनं एक विकेट घेतली. त्याआधी, मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावांत आटोपला. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार टिम पेननं पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं होतं. पण उपाहारानंतर शमीनं आधी पेन आणि मग ख्वाजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठ्या आघाडीपासून रोखलं. ख्वाजानं पाच चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तर पेननं 37 धावांचं योगदान दिलं. शमीनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं तीन आणि इशांत शर्मानं एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांवर रोखलं होतं. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कांगारुंचा कर्णधार टिम पेन 8 तर उस्मान ख्वाजा 41 धावांवर खेळत होते. ख्वाजानं पाच चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तर पेननं 37 धावांचं योगदान दिलं. यानंतर एकही खेळाडू तग धरु शकला नाही. विराट कोहलीच्या शतकानंतरही पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 283 धावांत आटोपला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day-1 Day 1 Stumps : 117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Embed widget