एक्स्प्लोर

IND vs AUS : भारतीय संघ घोषित, राहुलला संधी, मयांक मार्कंडेयचं पदार्पण

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही भारताची अखेरची स्पर्धा असणार आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही भारताची अखेरची स्पर्धा असणार आहे. भारतीय संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या के.एल राहुलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तर फिरकीपटू रविंद्र जाडेजा, खलील अहमद, सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आले आहे. विजय शंकर आणि पंतला टी-20 आणि एकदविसीय सामन्यात संधी दिली आहे. दोन टी-20 सामन्यासाठी मयांक मार्कंडेय या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला आराम देण्यात आला आहे. लेग स्पिनर मयांक मार्कंडेयचं संघात पदार्पण पंजाब आणि मुंबई इंडियन्सचा उदयोन्मुख लेग स्पिनर मयांक मार्कंडेनं भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात पदार्पण केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात दौऱ्यातल्या दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत मयांक मार्कंडे हाच भारत अ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेऊन भारत अ संघाला एक डाव आणि 68 धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी 20 सामन्यांमध्ये यजुवेंद्र चहलच्या साथीनं मयांक मार्कंडेय हा भारतीय संघातला दुसरा लेग स्पिनर असेल. लोकेश राहुलनं  संघात पुनरागमन कर्नाटकचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात पुनरागमन केलं आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळं हार्दिक पंड्या आणि राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर हार्दिक पंड्यानं न्यूझीलंड दौऱ्यातल्या वन डे सामन्यांमध्ये पुनरागमन साजरं केलं. पण राहुलच्या गाठीशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातलं अपयश असल्यानं त्याला भारत अ संघातून खेळवण्यात आलं. त्यानं लागोपाठ दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये बजावलेल्या कामगिरीनं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. याच कामगिरीनं राहुलला भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. टीम इंडियाचा दुसरा यष्टिरक्षक रिषभ पंत असण्याची चिन्हं ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघांमधून दिनेश कार्तिकला वगळण्यात आलं आहे. इंग्लंडमधील आगामी विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं टीम इंडियाचा दुसरा यष्टिरक्षक रिषभ पंत असण्याची चिन्हं दिसू लागली आहे. पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी आणि त्यानंतरच्या तीन वन डे सामन्यांसाठी असे संघ जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही संघांमध्ये अनुभवी महेंद्रसिंग धोनी आणि युवा रिषभ पंत या दोनच यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकासाठी दुसरा यष्टिरक्षक म्हणून पंतच्या नावाला झुकतं माप मिळण्याची अधिक शक्यता आहे. दोन टी-20 साठी भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, पंत, कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, बुमराह, शामी, चहल, विजय शंकर, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्केंडेय   पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, बुमराह, शामी, चहल, कुलदीप, विजय शंकर, पंत, सिद्धार्थ कौल, केएल राहुल अंतिम तीन वनडेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Elections Results 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Ashish Vidyarthi On Divorce At 55: 24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
Embed widget