एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st Odi : केदार जाधव-धोनीच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय

हैदराबादमधील सामन्यात विजयासाठी 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची चार बाद 99 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत धोनी आणि केदारनं पाचव्या विकेटसाठी 141 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हैदराबाद : केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 141 धावांच्या अभेद्य भागिदारीनं टीम इंडियाला हैदराबादच्या पहिल्या वन डेत सहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हैदराबादमधील सामन्यात विजयासाठी 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची चार बाद 99 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत धोनी आणि केदारनं पाचव्या विकेटसाठी 141 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या भागिदारीत केदारचा वाटा हा 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८१ धावांचा होता. धोनीनं 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी केली.

त्याआधी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसण घातली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सात बाद 236 धावांचीच मजल मारता आली.

सामन्यात उस्मान ख्वाजानं मार्कस स्टॉयनिसच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 20 षटकांत 87 धावांची भागीदारी रचली. पण ऑस्ट्रेलियाला त्या पायावर धावांचा डोंगर उभारता आला नाही. उस्मान ख्वाजानं 76 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 50 धावांची खेळी उभारली.

मार्कस स्टॉयनिसनं 53 चेंडूंत सहा चौकारांसह 37 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Shreyas Iyer IND vs IRE 2nd T20 : नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता

व्हिडीओ

Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
Satej Patil : MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, ऑनलाईनमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगसारखे धोके, 15 दिवस चार शिफ्टमध्ये परीक्षा चालतील, सतेज पाटील विधानपरिषदेत आक्रमक
MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, सतेज पाटील यांची मागणी, विधानपरिषदेत ऑनलाईनच्या त्रुटींचा पाढा वाचला
Embed widget