एक्स्प्लोर

IND vs AFG Test : ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN... अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण; अफगाणिस्तानविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

IND vs AFG 2026 One-off Test Predicted Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लांपुर येथे खेळवला जाणार आहे.

IND vs AFG 2026 One-off Test Predicted Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून मुल्लांपुर येथे खेळवला जाणार आहे. तब्बल 8 वर्षांनंतर दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला विशेष महत्त्व आहे कारण मुल्लांपुरच्या मैदानावर प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 0-2 ने गमावल्यानंतर भारतीय संघ विजयी पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. 2018 मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता. मात्र यावेळी अफगाणिस्तानचा संघ अधिक अनुभवी असून कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली ते कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करतील.

मुल्लांपुरची खेळपट्टी कशी असेल? (IND vs AFG Test Mullanpur pitch)

मुल्लांपुर येथे पहिल्यांदाच कसोटी सामना होत असल्याने दोन्ही संघांसाठी खेळपट्टीचा अंदाज बांधणे सोपे नाही. सुरुवातीच्या दोन दिवसांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. चेंडू नवीन असताना सीम आणि स्विंगचा प्रभाव दिसू शकतो. मात्र सामना जसजसा पुढे जाईल तसतशी फलंदाजी सोपी होत जाईल. चौथ्या-पाचव्या दिवशी खेळपट्टी झिजल्यावर फिरकीपटूंना मोठी मदत मिळू शकते.

भारताच्या संघरचनेकडे सर्वांचे लक्ष 

कर्णधार शुभमन गिलसमोर योग्य संतुलन साधण्याचे मोठे आव्हान असेल. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला उतरू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हरियाणाचा डावखुरा वेगवान गोलंदाज गुरनूर बरार आणि फिरकी अष्टपैलू हर्ष दुबे यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे मधली फळी अधिक मजबूत दिसत आहे. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्यावर गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India's Probable Playing XI)

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, गुरनूर बरार, प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Afghanistan's probable playing XI)

अब्दुल मलिक, सेदिकुल्लाह अटल, रहमानउल्ला गुरबाज, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अफसर जजई, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अशरफ, नांगेयालिया खारोटे, कैस अहमद, जियाउर रहमान. 

भारत आणि अफगाणिस्तान हेड-टू-हेड रेकॉर्ड (India vs Afghanistan Head-to-Head Record)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. 2018 मध्ये झालेल्या त्या सामन्यात भारताने 474 धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 आणि दुसरा डाव 103 धावांत संपुष्टात आला. भारताने तो सामना डाव आणि 262 धावांच्या प्रचंड फरकाने जिंकला होता. यावेळीही भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात असला तरी नव्या मैदानावरील परिस्थिती, युवा खेळाडूंचे पदार्पण आणि अफगाणिस्तानची सुधारलेली कामगिरी यामुळे सामना अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z

ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN... अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण; अफगाणिस्तानविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget