Junior Hockey World Cup : ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपमध्ये (Junior Hockey World Cup) भारतीय हॉकी संघाने अतुलनीय कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने (Indian Hockey Team) बेल्जियमला 1-0 ने मात देत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता सेमीफायनलच्या सामन्यात भारत जर्मनीविरुद्ध दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतातील हॉकीप्रेमी उत्सुक आहेत. 


संपूर्ण मालिकेत भारताच्या डिफेन्सने अप्रतिम कामगिरी केली आहे. संघाचे गोलकिपर  प्रशांत चौहान आणि पवन नेबाव यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. दरम्यान भारताने आतापर्यंत केलेल्या खेळीमुळे आज जर्मनीला मात देण्याचे भारताची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे भारताने स्पर्धेत खराब सुरुवात करुनही पुनरागमन करत इथवर बाजी मारली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फ्रान्सकडून पराभव पत्करल्यानंतर भारताला क्वॉर्टर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणं गरजेचं होतं. भारतानं ग्रुपच्या दुसऱ्या सामन्यात कॅनडाला 13-1 च्या फरकानं पराभूत करुन क्वॉर्टर फायनल्समध्ये आपली जागा पक्की केली. पोलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर करो या मरोची परिस्थिती होती. ज्यात विजय मिळवल्य़ानंतर भारत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमला मात देत आज जर्मनीविरुद्ध लढाईसाठी सज्ज झाला आहे. 



सामना कधी आणि कुठे?


सामना आज (3 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ओदिशातील कलिंगा हॉकी मैदानावर खेळवला जाणार आहे. तुम्ही घरबसल्या हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स1 एचडीवर पाहता येणार आहे.


संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha