नागपूर : 'झाडे लावा, झाडे जगवा' हा नारा देताना अनेकजण दिसतात, पण यासाठी उपाययोजना मात्र फार कमी केल्या जातात. पण आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मात्र नागपूरमधील एक 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड वाचवण्यासाठी सरसावले आहेत. संबधित झाड कापण्याची महापालिकेकडे घनश्याम पुरोहित नावाच्या व्यक्तीने परवानगी मागितली होती. मात्र ही बातमी आदित्य ठाकरेंच्या कानावर येता त्यांनी स्वत:हून हे झाड वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक प्रशासनाला त्यांनी तसा संदेशही पाठवला आहे.


नेमकं प्रकरण काय?


नागपूरमधील हे 208 वर्ष जुने झाड पिंपळाचे आहे. दरम्यान संबधित झाड असलेली जमीन घनश्याम पुरोहित ह्यांनी विकत घेतली आहे. त्यानंतर त्यांनी संबधित जागा वापरण्यासाठी झाड कापू टाकण्याची परवानगी पालिकेला मागितली. ज्यानंतर विरोध करणाऱ्या ग्रीन व्हिजिल ह्या एनजीओने सोशल मीडियावरून ही बाब सर्वांसमोर आणली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या कानावर हे प्रकरण येताच आदित्य ठाकरेंनी स्वतः नागपूर महापालिका आयुक्तांना हे झाड वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा असा संदेश दिल्याचे समोर येत आहे.


खरं तर 50 वर्षांहून जास्त वयाचे कुठले ही झाड हे हेरिटेज मानले जाते. त्यामुळे खरं तर हा पिंपळ हेरिटेज आहेच. पण पुरोहित ह्यांची झाड कापायची परवानगी मागितल्यावर नागपूर महापालिकेने ह्यावर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ऑब्जेक्शन मागवले आहेत. मात्र आता एकीकडे हा विरोध आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंची मध्यस्ती त्यामुळे नक्कीच हे झाड वाचेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha