एक्स्प्लोर
आयपीएल लिलावात केकेआरच्या या 'मिस्ट्री गर्ल'चीच चर्चा
आयपीएल फ्रँचायझींमध्ये एक असा चेहरा होता, ज्याच्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.

बंगळुरु : यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लावण्यात आली. बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट यांसारखे सर्वाधिक बोली लावण्यात आलेल्या खेळाडूंची जोरदार चर्चा झाली. मात्र आयपीएल फ्रँचायझींमध्ये एक असा चेहरा होता, ज्याच्याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.
जगभरातील माजी खेळाडू, मेंटॉर, प्रशिक्षक आणि संघ मालकांसोबत असलेल्या या चेहऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. मात्र ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून कोलकाता नाईट रायडर्सची सहमालक जुही चावलाची मुलगी जान्हवी होती.
कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझींमधून जान्हवी खेळाडूंवर बोली लावत होती. हा नवा चेहरा पाहिल्यानंतर सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता होती. 17 वर्षाची जान्हवी आयपीएल लिलावात सहभाग घेणारी सर्वात युवा सदस्य होती.
जान्हवीने दहावीपर्यंतचं शिक्षण धीरुभाई अंबानी स्कूलमधून पूर्ण केलं असून पुढील शिक्षण ती लंडनच्या चार्टर हाऊस ऑफ बोर्डिंग स्कूलमध्ये घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
