एक्स्प्लोर

विश्वचषकाच्या इतिहासातील महागडा गोलंदाज रशीदची आईसलँड क्रिकेटकडून खिल्ली

'रशीद खानने विश्वचषक 2019 मध्ये अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक ठोकल्याचं ऐकलं. मस्त. 56 चेंडूंमध्ये 110 धावा. विश्वचषकात एखाद्या गोलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा' असं ट्वीट आईसलँड क्रिकेटने केलं.

मुंबई : जागतिक वन डे रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान नऊ षटकात 110 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. रशीदचा विक्रम लाजिरवाणा असला, तरी आईसलँड क्रिकेटने त्याची ट्विटरवरुन उडवलेली खिल्ली कोणालाच रुचलेली नाही. रशीद बॅड पॅचमधून सावरेल, असा विश्वास व्यक्त करत अनेकांनी आईसलँड क्रिकेटवर टीकेची झोड उठवली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. यजमान संघ अफगाणिस्तानला नेस्तनाबूत करेल, याची प्रेक्षकांना खात्री होतीच. मात्र हा सामना एकतर्फी होऊन इंग्लंड 150 धावांनी मात करेल, याचा विचार कोणाच्याही मनात नव्हता. गेल्या वर्षी रशीद खानने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सर्वात कमी वयाचा गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला होता. परंतु इंगलंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीची पिसं काढली. रशीदसाठी हा सर्वात दुर्दैवी दिवस ठरला. मॉर्गनने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची विक्रमी खेळी केली. पहिल्या चार षटकात त्याने 29 धावा दिल्या, तर पुढच्या पाच षटकात त्याने तब्बल 81 धावा दिल्या. त्यामुळे एकही गडी न गमावता नऊ षटकात रशीदने 110 धावा देण्याचा पराक्रम केला. विश्वचषक स्पर्धेच्या 44 वर्षांच्या इतिहासातला आतापर्यंतचा हा सर्वात महागडा स्पेल ठरला आहे. तर वनडे इतिहासात शंभरपेक्षा अधिक धावा देणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. एकीकडे, सोशल मीडियावर यूझर्सनी त्याची विकेट घेतली, तर ल्युक राईट, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, इश सोधी सारख्या क्रिकेटपटूंनी रशीदला पाठिंबाही दिला. मात्र आईसलँड क्रिकेटच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन त्याची चांगलीच टेर उडवण्यात आली. 'रशीद खानने विश्वचषक 2019 मध्ये अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक ठोकल्याचं ऐकलं. मस्त. 56 चेंडूंमध्ये 110 धावा. विश्वचषकात एखाद्या गोलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा. मस्त फलंदाजी केलीस' अशा आशयाचं ट्वीट करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Ire 1st T20 Live Update : 30 धावांवर 3 विकेट्स ते थेट 182 चा धावांचा डोंगर! आयर्लंडचा पलटवार, भारतासमोर मोठे आव्हान, हर्षित राणाचा कहर
Ind vs Ire Live Update : 30 धावांवर 3 विकेट्स ते थेट 182 चा धावांचा डोंगर! आयर्लंडचा पलटवार, भारतासमोर मोठे आव्हान, हर्षित राणाचा कहर
Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 1st T20 : IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रेयस अय्यरने सगळं काही सांगून टाकलं
IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रेयस अय्यरने सगळं काही सांगून टाकलं
Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Embed widget