एक्स्प्लोर

महिला ट्वेन्टी 20 विश्वचषक : आज भारत पाकिस्तानशी भिडणार

ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातील दुसरा सामना आज पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात भारतीय महिलांचं पारडं जड मानलं जात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

भारतीय महिलांनी शुक्रवारी न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव करून, ट्वेन्टी ट्वेन्टीत आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. या सामन्यात हरमनप्रीतनं अवघ्या 51 चेंडूंत 103 धावांची, तर जेमिमा रॉड्रिग्सनं 45 चेंडूंत 59 धावांची खेळी उभारली.

त्यामुळे भारतीय संघानं न्यूझीलंडला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. मग हेमलता, पूनम यादव आणि राधा यादवनं न्यूझीलंडला 160 धावांत गुंडाळलं. भारतीय महिला संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 52 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

9 नोव्हेंबरपासून महिला टी20 विश्वचषक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय महिलांचा टी 20 विश्वचषकातील प्रवास...  

सलामीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला. आज भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. त्यानंतर 15 नोव्हेंबरला आयर्लंडविरुद्ध तर 17 नोव्हेंबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघ दोन हात करेल.

ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारतीय महिला संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. गेल्या पाच विश्वचषकांत तीन वेळा ऑस्ट्रेलियाने तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ नवा इतिहास घडवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget