एक्स्प्लोर

...तर कसोटी क्रिकेटमधून टॉस बंद होणार?

कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे.

मुंबई : क्रिकेटमध्ये टॉस अर्थात नाणेफेक अतिशय महत्त्वाची समजली जाते. प्रत्येक सामन्याआधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणार हे ठरवलं जातं. पण कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची ही 141 वर्षांची जुनी परंपरा बंद करण्याबाबत विचार सुरु आहे. सामन्याआधी होणारा टॉस बंद करण्याचा विचार आयसीसी करत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. जर यावर सहमती झाली तर 2019 मध्ये सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेपासून नाणेफेक बंद केली जाईल. 141 वर्षांची जुनी परंपरा कसोटी क्रिकेटमध्ये टॉसची परंपरा 141 वर्ष जुनी आहे. कसोटी स्पर्धेत यजमान संघाला आपल्याच घरच्या मैदानावर खेळताना फायदा मिळतो, असा तर्क टॉस बंद करण्यामागे लढवला जात आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये मेलबर्नच्या एमसीजी ग्राऊंडमधील सामन्यातून झाली होती. तेव्हापासून सामन्याच्या आधी नाणेफेक करुन कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोण क्षेत्ररक्षण करणार हे ठरवलं जातं. टॉस बंद करण्यामागचा दावा? नाणेफेकदरम्यान यजमान देशाचा कर्णधार नाणं उडवतो आणि त्यानंतर पाहुण्या संघाचा कर्णधार छापा किंवा काटा सांगतो. पण यामुळे यजमान संघाला फायदा मिळतो. यानंतर खराब पीच बनवण्याची प्रकरणं समोर येतात. परिणामी नाणेफेकीचं मूल्य राहत नाही, असा दावा टॉसच्या विरोधात बोलणारे करत आहेत. टॉसऐवजी पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे तटस्थ पीच बनण्याची शक्यता जास्त असेल, असा दावा केला जात आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीमध्ये कोणाचा समावेश? आयसीसी क्रिकेट समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याशिवाय अँड्र्यू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट, अंपायर रिचर्ड केटेलबोरोग, आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले, शॉन पॉलक आणि क्लेरी कोनोर यांचा समावेश आहे. अनिल कुंबळेंच्या अध्यक्षतेखालील या समितीचे काही सदस्य कसोटी क्रिकेटमधून टॉस बंद करण्याच्या बाजूने आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आयसीसी क्रिकेट समितीची मुंबईत बैठक होणार आहे. पण त्याआधीच कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याचा विचार सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget