Harbhajan Singh : वर्ल्डकप स्पर्धेत सलगी तीन पराभव स्वीकारल्यानंतर 'करो वा मरो'च्या स्थितीत पोहोचलेल्या पाकिस्तानने स्पर्धेत सर्वाधिक खतरनाक कामगिरी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला शुक्रवारच्या सामन्यात कडवी झुंज दिली. मात्र, अम्पायर काॅल त्यांच्या मुळावर आला. त्यामुळे अंम्पायर काॅलवरून पुन्हा एकदा क्रिकेट जगतात वादळ सुरु झालं आहे. 






आयसीसीकडे नियम बदलण्याची मागणी


भारताचा माजी फिरकी गोलंदाज आणि स्पर्धेत समालोचन करत असलेल्या हरभजन सिंगने अंपायर काॅलवर आयसीसीचे कान उपटले आहेत. पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला. खराब अंपायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे त्याने म्हटले आहे. भज्जीने आयसीसीकडे नियम बदलण्याची मागणीही केली आहे. 


हरिस रौफच्या ज्या चेंडूवर पाकिस्तानचा विजय निश्चित झाला, त्या चेंडूबाबत हरभजनने हा प्रश्न उपस्थित केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 46व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तबरेझ शम्सीला एलबीडब्ल्यू घोषित करण्याचे अपील करण्यात आले. अंपायरने शम्सीला आऊट न दिल्याने कर्णधार बाबर आझमने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू लेगस्टंपला थोडासा आदळताना दिसला. म्हणजेच अंपायर कॉल दिला. त्यामुले मैदानी पंचाचा निर्णय नॉट आउट असल्याने दक्षिण आफ्रिकेला जीवदान मिळाले आणि विजयही निश्चित झाला, आणि पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप निश्चित झाले. 






पाकिस्तान संघाने 7 धावांनी सामना जिंकला असता


जर ही विकेट मिळाली असती तर सामना इथेच संपला असता आणि पाकिस्तान संघाने 7 धावांनी सामना जिंकला असता. कारण यावेळी दक्षिण आफ्रिकेने 263 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. या चुकीनंतर दक्षिण आफ्रिकेने पुढच्या 8 चेंडूत विजय मिळवला. यावरच हरभजनने प्रश्न उपस्थित केला आहे.


हरभजनने काय म्हणाला?


हरभजनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'खराब अंपायरिंग आणि चुकीचे नियम पाकिस्तानला महागात पडले. आयसीसीने हा नियम बदलण्याची गरज आहे. जर चेंडू स्टंपला लागला तर तो आऊट द्यायला हवा, मैदानावरील अंपायरने तो आऊट दिला किंवा नाही. तसे नसेल तर तंत्रज्ञानाचा काय उपयोग?






वाॅर्नरच्या जाहीर मागणीने सगळ्या अंपायर्सच्या छातीत कळ येण्याची वेळ! 


दुसरीकडे, भर स्पर्धेत अंम्पायरची कामगिरी खेळाडूंप्रमाणे मोठ्य स्क्रीनवर दाखवावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वादग्रस्त एलबीडब्ल्यू बाद झाल्यानंतर पंचांकडून अधिक जबाबदारीची मागणी त्याने केली होती. वॉर्नरला पंच जोएल विल्सन यांनी 11 धावांवर मैदानावर एलबीडब्ल्यू आऊट दिले. त्याने रिव्ह्यूची मागणी केली. हॉक आय (बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा एक भाग) ने दाखवले की चेंडू त्याच्या लेग-स्टंपला क्लिप करण्यासाठी पुरेसा आहे. अंपायर कॉल असल्याने ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू ठेवला, पण वॉर्नरने मैदानातून बाहेर पडताना संतप्त प्रतिक्रिया दिली. डेव्हिड वॉर्नरने पंचांनी त्यांच्या कारकिर्दीत किती निर्णय बरोबर दिले आणि किती चुकीचे दिले याची सांख्यिकी (एकूण कामगिरी) मोठ्या स्क्रीनवर दाखवावी, अशी मागणी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या