World Cup 2023 Points Table Update After SA vs PAK: वनडे वर्ल्डकपमध्ये 2023 (ODI World CUP 2023) चा 26 वा सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल केला आणि अव्वल स्थान गाठलं, त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली. त्याचवेळी सलग चौथा सामना गमावणाऱ्या पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.
दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेतील पाचवा सामना जिंकून 10 गुण मिळवून भारतीय क्रिकेट संघाकडून नंबर वनचं स्थान हिसकावून घेतलं. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांचे 10 गुण असले तरी नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. तर आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागलेला पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला आहे.
टॉप 4 मध्ये मोठे बदल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर घसरली. मात्र, ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर कायम आहे. टीम इंडियानं पुढचा इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येऊ शकते. आतापर्यंत, टीम इंडिया हा एकमेव संघ आहे, ज्यानं एकही सामना गमावलेला नाही.
इतर संघांची अवस्था काय?
टॉप 4 मधील उर्वरित संघांमध्ये, श्रीलंका निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत पाचव्या, पाकिस्तान निगेटिव्ह -0.387 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सहाव्या, अफगाणिस्तान निगेटिव्ह -0.969 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सातव्या, बांगलादेश निगेटिव्ह -1.253 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत आठव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.634 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या आणि नेदरलँड्स निगेटिव्ह -1.902 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.
भारताला मागे टाकत पॉईंट टेबलमध्ये अव्वल
1999 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका विश्वचषक सामन्यात (T20/ODI) पाकिस्तानचा पराभव केला आहे. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सहा सामन्यांतील हा पाचवा विजय ठरला. या विजयासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 10 गुण आहेत, परंतु चांगल्या नेट-रन रेटमुळे आफ्रिका अव्वल स्थानावर आली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेनं भारतापेक्षा एक सामना अधिक खेळला आहे. टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :