लखनौ : स्टार ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) बॉल-ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी लखनौमध्ये (Lucknow) श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्यात वादग्रस्त एलबीडब्ल्यू बाद झाल्यानंतर पंचांकडून अधिक जबाबदारीची मागणी त्याने केली. श्रीलंकेविरुद्ध दिलशान मधुशंकाचा चेंडू वॉर्नरच्या लेग-स्टंपच्या अगदी जवळ पॅडवर आदळल्याने वॉर्नरला पंच जोएल विल्सन यांनी 11 धावांवर मैदानावर एलबीडब्ल्यू आऊट दिले. त्याने रिव्ह्यूची मागणी केली. हॉक आय (बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा एक भाग) ने दाखवले की चेंडू त्याच्या लेग-स्टंपला क्लिप करण्यासाठी पुरेसा आहे. अंपायर कॉल असल्याने ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू ठेवला, पण वॉर्नरने मैदानातून बाहेर पडताना संतप्त प्रतिक्रिया दिली.
पंचांची कामगिरी मोठ्या स्क्रीनवर दाखवावी
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने आज बोलताना या सर्व पार्श्वभूमीवर मोठी मागणी केली. पंचांनी त्यांच्या कारकिर्दीत किती निर्णय बरोबर दिले आणि किती चुकीचे दिले यांची सांख्यिकी (एकूण कामगिरी) मोठ्या स्क्रीनवर दाखवावी. तसेच सोमवारी झालेल्या प्रकारानंतर तो नाराज का होता हे स्पष्ट केले. राग तंत्रज्ञानावर जास्त होता आणि पंच विल्सन यांच्या अंगुलीनिर्देश केलं नसल्याचे त्याने सांगितले. वॉर्नर म्हणाला की, मी जोएल यांना विचारले की मी बाहेर असताना काय झाले, आउट का दिले, ते म्हणाले की, चेंडू परत स्विंग होत होता. जर त्यांना असे वाटत असेल म्हणून हा निर्णय दिला, तर मग रिप्ले पाहिल्यावर तुम्हाला थोडासा राग येतो. ते नियंत्रणाबाहेर आहे.
तेव्हा त्यांची आकडेवारीही बोर्डवर येताना मला आवडेल
तो पुढे म्हणाला की, मला काय पहायचं आहे या संदर्भात बरंच काही सांगायचं आहे. हे कदाचित समोर येणार नाही. परंतु, तुम्ही फलंदाजीसाठी येताना आकडेवारी बोर्डवर जाते. जेव्हा ते पंचांची घोषणा करतात आणि ते पडद्यावर येतात, तेव्हा त्यांची आकडेवारीही बोर्डवर पाहण्यास आवडेल. कारण आपण ते NRL (नॅशनल रग्बी लीग) मध्ये पाहतो. NRL ती आकडेवारी दाखवते. मला वाटते की NFL (नॅशनल फुटबॉल लीग) ही आकडेवारी तसेच दर्शवते. मला वाटते की प्रेक्षकांसाठी देखील हे पाहणे खूप मोठी गोष्ट आहे. साहजिकच खराब कामगिरीमुळे खेळाडूंना वगळले जाते. पॅनेलमध्ये काय चालले आहे हे आम्हाला कधीही स्पष्ट केले जात नाही. प्रेक्षकांना दाखविण्यासाठी फक्त छोट्या गोष्टी असल्या तरी ते सोपे नाही, असेही त्याने सांगितले. 36 वर्षीय वाॅर्नरने सांगितले की पंचांच्या आयसीसी एलिट पॅनेलमध्ये कोणतेही पक्षपाती निर्णय घेणारे नाहीत, परंतु त्यांच्याकडून अधिक जबाबदारी हवी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या