New Zealand vs Afghanistan : दमदार सुरुवातीनंतर सलग तीन विकेट गमावल्याने अवघ्या 21.4 षटकांमध्ये चार बाद 110 अशी अवस्था झालेल्या न्यूझीलंडला मधल्या फळीतील कॅप्टन टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांच्या फलंदाजीने तारले. दोघांनी पाच विकेटसाठी शतकीय भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले. त्यामुळे या सामन्यावर अफगाणिस्ताने पकड मिळवून गमावली.न्यूझीलंडने 4 बाद 110 वरून 6 बाद 288 अशी मजल मारली. खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फठका अफगाणिस्तानला बसला. 






फिलिप्सने आक्रमक फलंदाजी करताना शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे न्यूझीलंडची नौका अडीचशेच्या पार झाली. त्याला कर्णधार टॉम लॅथमने संयमी साथ दिली. त्यामुळे 22 ते 47 अशी षटके संयमाने खेळू काढत न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दरम्यानच्या काळात अफगाणिस्तानच्या फिल्डींगमधील कुचराई सुद्धा न्यूझीलंडच्या पत्त्यावर पडली. याचा फटका एकाच षटकामध्ये रशीद खानला बसला. टाॅम लॅथमचा झेल त्याच्या सलग दोन ओव्हरमध्ये दोनवेळा सुटला. त्याने अखेर 45 व्या षटकांत आपलं अर्धशतक पूर्ण केले. अखेर ही जोडी 48 व्या षटकात नावीनने बाद केली. टाॅम लॅथम 68 धावांवर बाद झाला, तर फिलिप्स 71 धावा करून बाद झाला. शेवटच्या क्षणी चॅपमनने 12 चेंडूत 25 धावा ठोकत न्यूझीलंडला भक्कम धावसंख्या करून दिली. 






तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजयाची नोंद केल्यानंतर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात डेवाॅन कान्वे आणि विल यंग यांनी केली. संघाची धावसंख्या अवघी 30 झाली असताना सातव्या शतकामध्ये कॉन्वेला मुजीबने बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर विल यंग आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रवींद्र यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात अफगाणिस्तानच्या फिरकीला यश आले. 






अफगाणिस्तानचा गोलंदाज अजमतुल्लाहने एका षटकामध्ये रचिन रविंद्र आणि विल यंग यांना बाद करत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे एक बाद 109 या स्थितीतून त्यांची 3 बाद 110 अशी झाली. त्यानंतर आलेल्या मिशेल सुद्धा रशीद खानचा बळी ठरला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था आणखी बिकट झाली. न्यूझीलंडची अवस्था 21.4 षटकांत चार बाद 110 अशी झाली. मागील सामन्यातही इंग्लंडविरोधात अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी निर्णायक राहिली होती. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव गडगडला होता. त्यामुळे न्यूझीलंडची फलंदाजी अफगाणी माऱ्यासमोर थोडी अडखळताना दिसून आली. 


इतर महत्वाच्या बातम्या