Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kiran Mane : "सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व..."; किरण मानेंनी शेअर केली 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपटाबद्दल खास पोस्ट


Kiran Mane: 'थँक्यू यू फॉर कमिंग' (Thank You For Coming) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी काही प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं.  भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला या अभिनेत्रींनी या चित्रपटात काम केलं आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


69th National Film Awards: 'एकदा काय झालं!' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अन् निखिल महाजन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका!


National Film Awards 2023 : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक मराठी चित्रपटांचा देखील या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aatmapamphlet Marathi Movie : "अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत"; ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "शेवटी मराठी सिनेमा आणि..."


Aatmapamphlet Marathi Movie:  आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या कथानकाचं आणि या चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केले. पण आता आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करुन एक खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळकची धमाकेदार एन्ट्री; 'या' भूमिकेत दिसणार अभिनेता


Suyash Tilak Entry Aboli Serial : 'अबोली' (Aboli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेता सुयश टिळकची (Suyash Tilak) धमाकेदार एन्ट्री होणार आहे. सचित राजेच्या भूमिकेत सुयश दिसणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kedar Shinde : "यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव..."; लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेची खास पोस्ट!


Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde)  हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या  'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच त्यांच्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात सना शिंदेनं (Sana Shinde) काम केलं. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील सनाच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केलं. आज सनाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा