पुणे : वर्ल्डकपमध्ये थाटात सुरुवात केलेल्या टीम इंडियाची आज पुण्यात बांगलादेशविरोधात लढत होत आहे. 2007 मधील कटू आठवणी पाहता टीम इंडिया या सामन्यात बांगलादेशला (India vs Bangladesh) कमी लेखण्याची चूक करणार नाही यात शंका नाही. मात्र, टीम इंडियाची सांघिक कामगिरी पाहता बांगलादेशला चांगलाच घाम फुटणार आहे. टीम इंडियाची फलंदाजी बलस्थान असलं, तरी गोलंदाजांनी केलेली कामगिरी सुद्धा उजवी राहिली आहे. 






कोहली, रोहित शर्मा नेहमीच कर्दनकाळ 


बांगलादेशविरोधात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि किंग कोहली (Virat Kohli) नेहमीच टाॅप राहिले आहेत. दोघांची एकत्रित आकडेवारी बांगलादेशला डोकं खाजवण्यासाठी पुरेशी आहे. वयाची छत्तीशी पार करुनही रोहितच्या गगनचुंबी षटकारांनी  गोलंदाज भांबावून गेले आहेत. 






दोघांच्या विक्रमावर एक नजर टाकूया




    • रोहित शर्मा आयसीसी टूर्नामेंटमध्ये शेवटच्या 3 सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध [ODI]

    • 2015 विश्वचषकात शतक

    • 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक

    • 2019 विश्वचषकात शतक

    • 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माची सरासरी 54.69 आणि स्ट्राइक रेट 116.51 आहे.

    • विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी वनडे चेसमध्ये 50+ सरासरी आणि 5,000+ धावा केल्या आहेत.

    • रोहित शर्माची बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये सरासरी 56.77 आणि स्ट्राइक रेट 96.09 आहे. 




कोहली बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात



  • एकूण सामने : 15

  • धावा : 807

  • शतके : 4

  • पन्नास : 3

  • सरासरी: 67.25






एकदिवसीय विश्वचषकात कोहली बांगलादेशविरुद्ध



  • एकूण सामने : 3

  • धावा : 129

  • शतक : 1

  • सरासरी : 64.50


पुण्याच्या मैदानावर कोहली



  • एकूण सामने : 7

  • धावा : 448

  • शतके : 2

  • सरासरी : 64 


विश्वचषकात भारत-बांगलादेश आमनेसामने


वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश 4 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडिया 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध फक्त एकदाच हरली होती. यानंतर टीम इंडियाने 2011, 2015 आणि 2019 मध्ये सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे या चारही प्रसंगी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या