अहमदाबाद : गेल्या चार वर्षांपासून प्रदीर्घ प्रतीक्षा असलेल्या वर्ल्डकपचा थरार आजपासून अवघ्या काही मिनिटात सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा सामना उपविजेत्या न्यूझीलंडशी ( England vs New Zealand) होणार आहे. न्यूझीलंडचा संघ दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी चॅम्पियन होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, इंग्लंड एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये विश्वविजेता आहे. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड असेल यात शंका नाही. 


वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कधी होणार?


वर्ल्ड कप 2023 पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला म्हणजेच आज गुरुवारी होत आहे.


इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?


इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.


इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?


इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी दीड वाजता होईल.


इंग्लंड आणि न्यूझीलंड मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे? 


डिस्ने प्लस हॉटस्टारवर वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल अॅपवर मॅच पाहिल्यास, तुम्हाला सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.


इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक सामना कोणतं चॅनल प्रसारित करेल?


भारतात होणार्‍या सामन्यांचे प्रसारण अधिकार जिओकडे असले तरी ICC इव्हेंट्स फक्त स्टार स्पोर्ट्सवरच प्रसारित होतील.


इतर महत्वाच्या बातम्या