Gadar 2 OTT Release Date : सनी देओल (Sunny Deol), अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) स्टारर 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आता सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत या सिनेमाने इतिहास रटला. 'गदर 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हा या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला. रेकॉर्डब्रेक कमाई केलेले हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 


'गदर 2' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? (Gadar 2 OTT Release)


'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. आता हा सिनेमा झी 5 (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झी 5 ने सोशल मीडियावर या सिनेमाचं एक पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"उलटी गिनती सुरू करा...तारा सिंह तुमची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टरर सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे".






सनी देओलचा अॅक्शन मोड सिनेरसिकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. या सिनेमातील सनीचा 'हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' हा डायलॉग ऐकण्यासाठी चाहते सज्ज आहेत. या सिनेमातील 'उड जा काले कावा' आणि 'मैं निकला गड्डी लेके' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर : एक प्रेम कथा' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील तारा सिंह आणि सकिनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. आजही त्यांची क्रेझ कायम आहे हे 'गदर 2' या सिनेमाने दाखवून दिलं आहे. 'गदर 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 526 कोटींची कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 31 दिवसांत केली 513.85 कोटींची कमाई