David Warner's Pushpa Dance: ODI वर्ल्ड कप 2023 चा 27 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्षेत्ररक्षण करताना 'पुष्पा' डान्स करून चाहत्यांना खूश केले. वॉर्नरच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


थेट मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरडून पुष्पाची काॅपी 


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सीमारेषेजवळ फिल्डिंग करताना वॉर्नरने पुष्पा चित्रपटातील गाण्यावर डान्स स्टेप करत आहे. वॉर्नरची चाल पाहून स्टँडमधील चाहते आनंदाने ओरडू लागतात. पुष्पा चित्रपटातील गाण्यावर वॉर्नर डान्स करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा असे केले आहे.






शतकानंतर झुकेगा नही साला!


वाॅर्नरने मागील सामन्यात दमदार शतकी खेळी केली. शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध त्याने आनंद व्यक्त करताना झुकेगा नही साला म्हणत हावभाव केले होते. वाॅर्नर नेहमीच बाॅलिवुड गाण्यावर थिरकताना दिसतो. मुलींसोबत केलेले रिल सुद्धा अनेकदा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 






वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्म 


वॉर्नर आतापर्यंत या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि एक अर्धशतक झळकले आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. वॉर्नरने 65 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. यापूर्वी त्याने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 104 धावा आणि पाकिस्तानविरुद्ध 163 धावा केल्या होत्या.






ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा केल्या


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकांत सर्वबाद 388 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 162.69 च्या स्ट्राईक रेटने 109 धावांची (67 चेंडू) खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. याशिवाय वॉर्नरने 81 धावा केल्या. हेड आणि वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 117 चेंडूत 175 धावांची भागीदारी केली.


इतर महत्वाच्या बातम्या