एक्स्प्लोर

IND vs SL सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' असे बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. लीड्सच्या मैदानात सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने इंग्लंडमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. लीड्सच्या मैदानात सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने इंग्लंडमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या सामन्यादरम्यान एका विमानाने अवकाशात पाच घिरट्या मारल्या. विमानातून एक बॅनर बाहेर झळकत होता आणि त्यावर 'जस्टिस फॉर काश्मीर' असे इंग्रजीत लिहिण्यात आले होते. ते विमान कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही घटना खूपच गांभीर्याने घेतली आहे. या घटनेमुळे इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये लोकांची ये-जा वाढल्यामुळे बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान 'जस्टीस फॉर बलुचिस्तान' असे बॅनर लावलेल्या विमानाने स्टेडियमभोवती घिरट्या घातल्या होता. याचा कोणत्याही तपास अद्याप समोर आलेला नाही. उलट याकडे स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि आयसीसीने दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget