एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफी : ऋषभ पंतसह पाच जणांना स्टँड बाय राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. मात्र आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे काही खेळाडू का वगळण्यात आले, असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. पण चांगल्या फॉर्मात असणाऱ्या पाच खेळाडूंचा स्टँड बाय यादीत समावेश करण्यात आला आहे. भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या 15 सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळालेलं नसलं तरी या स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळालं आहे. त्याशिवाय मुंबईकर गोलंदाज शार्दूल ठाकूर तसंच दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि कुलदीप यादवचाही स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश आहे. भारताच्या पंधरा सदस्यीय संघातील एखाद्या खेळाडूला काही कारणास्तव माघार घ्यावी लागली, तर या स्टँड बाय खेळाडूंपैकी एकाला टीम इंडियात स्थान मिळू शकतं. केवळ आयपीएलमधल्या कामगिरीच्या आधारे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळाडूंची निवड करता येणार नाही, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे. संघनिवडीसाठी खेळाडूंचा अनुभव, गेल्या वर्षभरातली त्यांची कामगिरी आणि इंग्लंडमधलं वातावरण यांचा विचार करण्यात आल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफी : धोनीच्या संघातील 8 खेळाडू कोहलीच्याही संघात! टीम इंडियानं 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघासमोर आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असेल. धोनीच्या त्या संघातील आठ खेळाडू विराटच्या टीममध्येही खेळताना दिसतील. धोनी आणि विराटशिवाय शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवनंही 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. संधी न मिळालेले खेळाडू सुरेश रैना, ईशांत शर्मा, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, इरफान पठाण, मुरली विजय, विनय कुमार हे खेळाडू 2013 च्या  चॅम्पियन्स ट्रॉफी संघात होते, मात्र त्यांना यंदा कोहलीच्या संघात स्थान मिळालं नाही. संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs MI Live Update IPL 2026 : जैस्वाल अन् सूर्यवंशीचं वादळ; राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा पाऊस, समोर ठेवले इतके मोठे लक्ष्य
RR vs MI Live IPL 2026 : जैस्वाल अन् सूर्यवंशीचं वादळ; राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा पाऊस, समोर ठेवले इतके मोठे लक्ष्य
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
Tamim Iqbal News : भारतविरोधी गरळ ओकली अन् बुलबुलने खुर्ची गमावली! BCCIला नडणाऱ्या बांगलादेशच्या टोळीचा गेम ओव्हर; तमीम इक्बाल झाला नवा बॉस
भारतविरोधी गरळ ओकली अन् बुलबुलने खुर्ची गमावली! BCCIला नडणाऱ्या बांगलादेशच्या टोळीचा गेम ओव्हर; तमीम इक्बाल झाला नवा बॉस
RR vs MI IPL 2026 Guwahati Weather : गुवाहाटीत दाटले काळे ढग! मुंबई-राजस्थान भिडणार की पाऊस खेळ बिघडवणार?, वाचा वेदर रिपोर्ट
गुवाहाटीत दाटले काळे ढग! मुंबई-राजस्थान भिडणार की पाऊस खेळ बिघडवणार?, वाचा वेदर रिपोर्ट

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर देऊ जे विसरु शकणार नाही, इराणचं ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
तुम्हाला असं उत्तर देऊ ते तुम्ही विसरु शकणार नाही, संस्कृती संपवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्पना इराणचं उत्तर
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
Embed widget