एक्स्प्लोर

... तर आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळणार : विराट कोहली

मी अशीच मेहनत करत राहिलो तर माझ्यात आठ ते दहा वर्षांचा खेळ बाकी आहे. मी दररोज नव्या गोष्टींची सुरुवात करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचंही माझ्यासाठी तेवढंच महत्त्व आहे, असंही विराट म्हणाला.

नवी दिल्ली : आपल्यात अजून आठ ते दहा वर्षांचं क्रिकेट बाकी असल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे. फिटनेस आणि ट्रेनिंग अशीच कायम राहिली तर आपण आणखी दहा वर्षे क्रिकेट खेळू असं विराटने सांगितलं. विराटने गेल्या काही दिवसात अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. तर आणखी मोठ्या विक्रमांच्या तो जवळ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग दोन शतकं ठोकून तो सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. वन डेतील 30 शतकं पूर्ण करत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. यासोबतच विराट कोहली शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरनंतर वन डेत सर्वाधिक शतकं ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत. विराटने या वर्षात सहा शतकं आणि सात अर्धशतकं पूर्ण करत 1639 धावा केल्या आहेत. चांगली कामगिरी करण्यामागे काहीही रहस्य नाही. अनेकांना तर हे देखील माहिती नाही की आम्ही किती मेहनत करतो. थकलेलं असतानाही 70 टक्के ट्रेनिंग पूर्ण करुन एखादा खेळाडू मध्येच आराम करतो, असं मी अजून पाहिलेलं नाही. आम्ही काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावतो, असं विराटने एका कार्यक्रमात सांगितलं. चांगली कामगिरी करण्याची माझी भूक कधीही संपत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी अशीच मेहनत करत राहिलो तर माझ्यात आठ ते दहा वर्षांचा खेळ बाकी आहे. मी दररोज नव्या गोष्टींची सुरुवात करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींचंही माझ्यासाठी तेवढंच महत्त्व आहे, असंही विराट म्हणाला. आमच्या काळात गॅजेट्स नव्हते. आजकाल लोक आयफोन किंवा आयपॅडवर व्यस्त असतात. आमच्या वेळी कुणाकडे व्हिडिओ गेम असेल तर सर्व जण त्याच्याकडे जाऊन तो गेम खेळण्याचा प्लॅन करायचो. मी माझं बालपण रस्ते आणि मैदानांवर विविध खेळ खेळून काढलंय. त्यामुळे तरुणांनी घराबाहेर पडावं आणि कोणत्या ना कोणत्या खेळात प्राविण्य मिळवावं, असं आवाहन विराटने तरुणांना केलं. तरुण खेळांकडे आकर्षित झाले तर आपल्याकडे खेळाडूंची संख्या वाढेल, ज्यामुळे मोठी मदत होईल, अंसही विराट म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : कॅच सुटले, विकेटही नाही...; श्रीलंकेत पहिल्याच सत्रात गंभीरच्या पोरांचं पितळ उघडं पडलं, लाज वाटावी अशी कामगिरी
कॅच सुटले, विकेटही नाही...; श्रीलंकेत पहिल्याच सत्रात गंभीरच्या पोरांचं पितळ उघडं पडलं, लाज वाटावी अशी कामगिरी
Hardik Pandya Trade IPL 2027 : 25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
Ind vs SL Shubman Gill : श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget