एक्स्प्लोर

सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राला किती रक्कम मिळाली ?

Neeraj Chopra Prize Money : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

Neeraj Chopra Prize Money : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले. तर पाकिस्तानच्या अरशद नदीम याला सिल्वर पदकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्रा याने फायनलमध्ये 86.32 मीटर, 84.64 मीटर , 87.73 मीटर आणि 83.98 मीटर थ्रो करत सूवर्णकामगिरी केली.  गोल्ड पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याला विजयानंतर किती रक्कम मिळणार आहे, हे तुम्हाला माहितेय का ? 

गोल्ड जिंकणाऱ्या नीरज याला किती रक्कम मिळणार ?

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याच्यावर पैशांचा वर्षाव होत आहे. अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याला मेडलसोबत 70 हजार डॉलर इतकी रक्कम मिळाली आहे. भारतीय रुपयांत बोलायचे झाल्यास नीरज चोप्रा याला 58 लाख रुपये इतकी विजयाची रक्कम मिळाली आहे. या स्पर्धेत सिल्वर पदक पटकावणाऱ्या पाकिस्तानच्या अरशद नदीम याला 35 हजार डॉलर (भारतीय रुपयात 29 लाख ) रुपये मिळणार आहेत. 

पॅरिस ऑलम्पिक 2024 साठी नीरज चोप्रा पात्र - 

बुडापेस्ट येथे ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रा याला 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळाले आहे. बुडापेस्टमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरणारा नीरज चोप्रा आता पॅरिस ऑलम्पिकसाठी पात्र ठरलाय. याआधी नीरज चोप्रा याने टोक्यो ऑलम्पिक्स (2021), आशियाई स्पर्धा (2018) यासह सहा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. पॅरिस ऑलम्पिकमध्येही नीरज चोप्रा याच्याकडून पदकाची आपेक्षा असेल. जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदकं मिळाली आहेत. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरजनं रौप्यपदक जिंकलं होतं. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून नीरजनं देशासाठी जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.  

नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी -

स्टॉकहोम डायमंड लीग 2022

स्वीडन येथे डायमंड लीग 2022 स्पर्धेत नीरज चोप्रा याने 89.94 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. त्यासोबत त्याने फिनलँडमध्ये पावो नुरमी गेम्समध्ये केलेला स्वत:चा विक्रम मोडीत काढला. फिनलँडमध्ये नीरज चोप्रा याने 89.30 मीटर दूर भाला फेक केली होती. 

दोहा डायमंड लीग, 2023

नीरज याने 88.67 इतका दूर भालाफेक करत 2023 मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.  पहिल्याच प्रयत्नात नीरज याने सुवर्ण जिंकले होते. 

विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2022

2022 मध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्रा याने रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेत रजत पदक जिंकणारा नीरज एकमेव खेळाडू होता. नीरज चोप्रा याने 88.13 मीटर दूर भालाफेक करत इतिहास रचला होता. 

आशियाई स्पर्धा, 2018

नीरज चोप्रा याने 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते. त्याने 88.06 मीटर भालाफेक केली होती. 

लुसान डायमंड लीग, 2023

नीरज याने 87.66 मीटर भाला थ्रो करत अव्वल स्थान पटकावले होते. पाचव्या प्रयत्नात नीरज चोप्रा याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. 

टोक्यो ऑलम्पिक, 2020

2020 मध्ये झालेल्या टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.  87.58 मीटर थ्रो करत नीरज चोप्रा याने भारतासाठी गोल्ड जिंकले होते. 

विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023

88.17 मीटरचा थ्रो करत नीरज चोप्रा याने गोल्डवर नाव कोरलेय. या दमदार कामगिरीसह नीरज चोप्राला पॅरिस ऑल्मिपकचे तिकिटही मिळालेय. विश्व अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरणारा नीरज एकमेव भारतीय खेळाडू ठरलाय. 

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget