India vs Japan Hockey World Cup 2023  : भारतीय हॉकी संघाने (Team India) हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) आज झालेल्या सामन्यात जपान संघावर दमदार विजय मिळवला आहे. तब्बल 8-0 अशा मोठ्या फरकाने भारताने हा विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यानंतर आता सुरु वर्गीकरण सामन्यात (Classification Matches) भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे


भारतीय भूमीत सुरु असणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये (Hockey World Cup 2023) आजपासून (26 जानेवारी) वर्गीकरण सामने  खेळणार आहे. वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत. आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील विजयी संघ पुढे जाऊन नवव्या ते बाराव्या स्थानासाठी सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पराभूत संघाला तेराव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळावे लागतील. आज भारतीय संघ (Team India) वर्गीकरणाच्या सामन्यात जपानविरुद्ध मैदानात उतरला. सामन्यात सुरुवातीपासून भारतीय संघ अप्रतिम खेळ दाखवत होता. जपानच्या संघाला एकही गोल करता आला नाही पण सामन्यात भारताने मात्र तब्बल 8 गोल करत एका मोठ्या विजयाची नोंद केली. 






कसा आहे भारतीय संघ?


अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.


कसं आहे उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक?


 26 जानेवारी


प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)


27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
दुसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  7 वाजता


29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी  4:30 वाजता
सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना – सायंकाळी  7 वाजता


हे देखील वाचा-