FIH World Cup 2023 : भारतात पार पडणाऱ्या 15 व्या हॉकी विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला असून आजपासून (13 जानेवारी) सामने सुरू होत आहेत. या विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार वेगवेगळ्या पूलमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजयी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे उपांत्यपूर्व फेरी गाठू शकतील. या 16 संघांमध्ये पुढील 17 दिवसांत एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. 29 जानेवारीला हॉकी जगतातील नवा चॅम्पियन संघ समोर येणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेचं संपूर्ण सविस्तर वेळापत्रक आणि गट पाहूया...


पूल A: ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका.
पूल B: बेल्जियम, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान.
पूल V: नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया, चिली.
पूल D : भारत, इंग्लंड, स्पेन, वेल्स.


Hockey World Cup 2023 चं संपूर्ण वेळापत्रक 


13 जानेवारी
अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण अफ्रिका (भुवनेश्वर) – दुपारी 1:00 वाजता
ऑस्ट्रेलिया बनाम फ्रान्स (भुवनेश्वर)- दुपारी 3:00 वाजता
इंग्लंड विरुद्ध वेल्स (राउरकेला) – सायंकाळी 5:00 वाजता
भारत विरुद्ध स्पेन (राउरकेला) – सायंकाळी 7:00 वाजता


14 जानेवारी
न्यूझीलंड विरुद्ध चिली (राउरकेला) – दुपारी 1:00 वाजता
नेदरलँड विरुद्ध मलेशिया (राउरकेला) – दुपारी  3:00 वाजता
बेल्जियम विरुद्ध कोरिया (भुवनेश्वर) – सायंकाळी 5:00 वाजता
जर्मनी विरुद्ध जापान (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता


15 जानेवारी
स्पेन विरुद्ध वेल्स (राउरकेला) – सायंकाळी   5:00 वाजता
इंग्लंड विरुद्ध भारत (राउरकेला) – सायंकाळी  7:00 वाजता


16 जानेवारी
मलेशिया विरुद्ध चिली (राउरकेला) – दुपारी 1:00 वाजता
न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड (राउरकेला) – दुपारी 3:00 वाजता
फ्रान्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका (भुवनेश्वर) – सायंकाळी  5:00 वाजता
अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया (भुवनेश्वर) – सायंकाळी  7:00 वाजता


17 जानेवारी
कोरिया विरुद्ध जापान (भुवनेश्वर) – सायंकाळी  5:00 वाजता
जर्मनी विरुद्ध बेल्जियम (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता


19 जानेवारी
मलेशिया विरुद्ध  न्यूझीलंड (भुवनेश्वर) – दुपारी 1:00 वाजता
नेदरलँड विरुद्ध चिली (भुवनेश्वर) – दुपारी 3:00 वाजता
स्पेन विरुद्ध इंग्लंड (भुवनेश्वर) – सायंकाळी  5:00 वाजता
भारत विरुद्ध वेल्स (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता


20 जानेवारी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (राउरकेला) – दुपारी1:00 वाजता
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (राउरकेला) – दुपारी 3:00 वाजता
बेल्जियम विरुद्ध जापान (राउरकेला) – सायंकाळी  5:00 वाजता
कोरिया विरुद्ध जर्मनी (राउरकेला) – सायंकाळी  7:00 वाजता


24 जानेवारी
पहिला क्वार्टरफायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
दुसरा क्वार्टरफायनल: भुवनेश्वर –सायंकाळी  7 वाजता


25 जानेवारी
तिसरा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
चौथा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  7 वाजता


26 जानेवारी
प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)


27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
दुसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  7 वाजता


29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी  4:30 वाजता
सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना – सायंकाळी  7 वाजता


हे देखील वाचा-