एक्स्प्लोर

Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा

Heinrich Klassen Viral Video: हाॅटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्लासेन आपल्या लेकीसह रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Heinrich Klassen Viral Video: किरकोळ कमाईतही त्याचा दिखावा करणाऱ्यांची देशासह जगभरात कमी नाही. त्यातही क्रिकेट किंवा बाॅलिवूडची पार्श्वभूमी असल्यास सांगायलाच नको. प्रत्येकाला त्या आलिशान लाईफचा हेवा वाटत असतो. मात्र, कोट्यवधीची कमाई असताना साधेपणा जपणारे सुद्धा शेकडो आहेत. असाच साधेपणा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

क्लासेनचा रिक्षातून प्रवास

सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेनचा रिक्षातून प्रवास चर्चेचा विषय झाला आहे. हाॅटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्लासेन आपल्या लेकीसह रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सव्वा पाच कोटींची बोली लावत क्लासेनला हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. इतर लीगमधून क्लासेन खेळत असतो. अशा स्थितीत बक्कळ कमाई असूनही सर्वसामान्य पद्धतीने केलेला प्रवास चर्चेचा विषय झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

क्लासेन या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने (SRH) मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) 244 धावांचे मोठे लक्ष्य गाठून आठ चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला. आयपीएल 2026 हंगामातील हा त्यांचा सलग पाचवा विजय असून, त्यामुळे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी सामन्यात स्फोटक खेळी केली आणि दोघांनीही अर्धशतके झळकावली. क्लासेन या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिषेक शर्मा आणि हेड यांनी पॉवरप्लेमध्ये 92 धावांची धडाकेबाज भागीदारी केली. हेडने 19 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या, तर अभिषेकने 17 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. क्लासेनने 30 डूंमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 65धावा केल्या. अभिषेकनंतर, क्लासेनने 9 सामन्यांमध्ये 59.14  सरासरीने 414 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो या हंगामातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये एसआरएचसाठी 400 हून अधिक धावा करण्याचा हा क्लासेनचा सलग चौथा हंगाम आहे. 

सेहवागचा विक्रम मोडला

क्लासेनने आपल्या स्फोटक खेळीदरम्यान चार उत्तुंग षटकार मारले. यामुळे एसआरएचच्या या फलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. सेहवागने 104 डावांमध्ये एकूण 106 षटकार मारले आहेत. मुंबईविरुद्ध चार षटकार मारणाऱ्या क्लासेनने आता सेहवागला मागे टाकले आहे. क्लासेनने 58 सामन्यांच्या 54 डावांमध्ये 107 षटकार मारले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये 350 हून अधिक षटकार

इतकेच नाही, तर हेनरिक क्लासेननेही टी-20 क्रिकेटमध्ये 350 हून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. क्लासेनने जगभरातील टी-20 लीगमध्ये 258 सामन्यांच्या 262 डावांमध्ये 359 षटकार मारले आहेत. त्याने इंग्लंडच्या फिल सॉल्टला मागे टाकले आहे, ज्याने 338 सामन्यांच्या 328 डावांमध्ये 358 षटकार मारले आहेत. सॉल्ट या हंगामात आरसीबीकडून खेळत आहे. मात्र, तो गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याच्या पुनरागमनानंतर त्याला क्लासेनला मागे टाकण्याची संधी मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

जीवघेण्या आजारावर मात, धडाकेबाज खेळाडू पुन्हा सज्ज, 10 वर्षानंतर गाजवणार क्रिकेटचं मैदान 
जीवघेण्या आजारावर मात, धडाकेबाज खेळाडू पुन्हा सज्ज, 10 वर्षानंतर गाजवणार क्रिकेटचं मैदान 
Team India World Cup 2027 Schedule : रोहितचे षटकार, कोहलीचे चौकार! टीम इंडिया वर्ल्ड कप 2027ची फायनल गाठणार? भारतीय संघाचं संपूर्ण Schedule
रोहितचे षटकार, कोहलीचे चौकार! टीम इंडिया वर्ल्ड कप 2027ची फायनल गाठणार? भारतीय संघाचं संपूर्ण Schedule
ICC ODI World Cup 2027 Schedule : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानचा 10 ऑक्टोबरला थरार, पाहा संपूर्ण शेड्युल
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानचा 10 ऑक्टोबरला थरार, पाहा संपूर्ण शेड्युल
IND vs WI Squad Update : फिट असूनही वॉशिंग्टन सुंदरला डच्चू! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची सरप्राइज एन्ट्री, BCCIच्या घोषणा
फिट असूनही वॉशिंग्टन सुंदरला डच्चू! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची सरप्राइज एन्ट्री, BCCIच्या घोषणा

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget