एक्स्प्लोर
... तर पुन्हा शमीसोबत संसार करायला तयार : हसीन जहा
मोहम्मद शमीची अब्रू चव्हाट्यावर आणल्यानंतर हसीनने आता पुन्हा पतीसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

लखनौ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केल्यानंतर पत्नी हसीन जहाला पश्चात्ताप झाल्याचं दिसतंय. कारण, मोहम्मद शमीची अब्रू चव्हाट्यावर आणल्यानंतर हसीनने आता पुन्हा पतीसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. हसीन आज शमीच्या उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील घरी गेली होती. शमीने अटी मान्य केल्यास आपण पुन्हा एकत्र येऊ असं हसीनने म्हटलं आहे. शमीने आपली माफी मागावी, अशी मागणीही हसीनने केली. हसीन जहाने तिचा पती मोहम्मद शमीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमकीसह अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचाही खळबळजनक आरोप हसीनने केला होता. मात्र बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणात शमीला क्लीनचिट देण्यात आली. संबंधित बातम्या : मी आजही शमीवर प्रेम करते : हसीन जहां कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला? दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा
आणखी वाचा























