एक्स्प्लोर

द. आफ्रिकेविरुद्ध पंड्याची घोडचूक, दिग्गजांकडून कानउघडणी

क्रिकेटच्या मैदानावरील एक छोटीशी चूकही संपूर्ण संघाला महागात पडू शकते. अशीच काहीशी चूक आज (सोमवार) हार्दिक पंड्यानं पहिल्या डावात केली.

सेन्चुरियन (द. आफ्रिका) : क्रिकेटच्या मैदानावरील एक छोटीशी चूकही संपूर्ण संघाला महागात पडू शकते. अशीच काहीशी चूक आज (सोमवार) हार्दिक पंड्यानं पहिल्या डावात केली. त्यानं केलेल्या चुकीनं भारतीय संघ बराचसा अडचणीत आला. त्यामुळे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी पंड्याला खडे बोल सुनावले. द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या मैदानावर होते. या दोन्ही फलंदाजांकडून भारताला बऱ्याच आशा होत्या. पण आपल्या धावसंख्येत अवघ्या 4 धावांची भर घालून पंड्या रनआऊट झाला. यामध्ये सर्वस्वी चूक पंड्याचीच होती. पंड्यानं एक सरळ फटका मारुन धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरुवातीलाच कोहलीनं पंड्याला नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी पंड्या मागे फिरला. पण आपण क्रिझमध्ये आरामात पोहचू असा अतिआत्मविश्वास त्याला नडला. त्यावेळी फिलेंडरनं फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला. यावेळी पंड्या क्रिझच्या जवळ तर पोहचला. पण त्याचा पाय आणि बॅट दोन्हीही हवेत होतं. त्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आलं. ज्यावेळी भारतीय संघाला एका मजबूत भागीदारीची गरज होती तेव्हाच पंड्या अशाप्रकारे बाद झाल्यानं अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यावेळी समलोचन करणाऱ्या सुनील गावसकर यांनी देखील ही चूक अक्षम्य असल्याचं म्हटलं. दुसरीकडे माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनं देखील हार्दिकवर टीका केली. 'आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते. आपण सचिन तेंडुलकरला पाहा तो किती प्रतिभावंत खेळाडू होता. पण त्याच्यात कधीही अंहकार नव्हता.' दरम्यान, भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. यावेळी कर्णधार कोहलीनं 153 धावांची शानदार खेळी साकारली.

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 
संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर मोहम्मद कैफ संतापला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget