एक्स्प्लोर
VIDEO : हार्दिक पंड्या आणि शिखर धवनचा बाथरुम डान्स
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन यांचा आक्रमकपणा आपल्याला नेहमीच दिसून येतो. मात्र यावेळी या दोघांचा एक वेगळाच अंदाज समोर आला आहे. या व्हिडिओत हार्दिक आणि शिखर बाथरुममध्ये डान्स करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन यांचा आक्रमकपणा आपल्याला नेहमीच दिसून येतो. मात्र यावेळी या दोघांचा एक वेगळाच अंदाज समोर आला आहे. या व्हिडिओत हार्दिक आणि शिखर बाथरुममध्ये डान्स करताना दिसत आहेत.
हार्दिक पंड्यांने रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दोन्ही खेळाडू बिनधास्त पद्धतीने डान्स करत आहेत. हे दोघेही इंग्रजी गाण्यावर पंजाबी डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हार्दिक आणि शिखरचा हा बाथरुम डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. भारत उद्यापासून इंग्लंडबरोवर दोन हात करणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने आणि 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.Me & jatta caught in action. We love dancing & singing. 😁 🎶 @SDhawan25 pic.twitter.com/P4vqsuxUVh
— hardik pandya (@hardikpandya7) July 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement