Harbhajan Singh Tauba Tauba Song Controversy : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रकरण तापत असल्याचे पाहून अखेर हरभजन सिंगने या प्रकरणावर आपले मौन सोडले असून माफीही मागितली आहे. भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज असलेला हरभजन (Harbhajan Singh) ट्वीटरवर पोस्ट करत म्हणाला की, "मला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती", असं म्हणत हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून वादग्रस्त डान्स व्हिडिओ डिलीट केलाय.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
वास्तविक, भारतीय संघाने नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्याशिवाय युवराज सिंग आणि सुरेश रैना तोबा-तोबा गाण्यावर लंगडी मारताना दिसत आहेत. लंगडत असताना त्याने विकी कौशलच्या व्हायरल स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. हरभजनने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, 15 दिवस सतत क्रिकेट खेळल्यानंतर त्याच्या शरीराचा तोबा-तोबा झालाय. हा व्हिडीओ समोर येताच, मग पॅरालिम्पिक समिती, अनेक पॅरा ॲथलीट्स आणि अगदी National Centre for Promotion of Employment for Disabled People (NCPEDP) ने हरभजन सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, प्रकरण चांगलचं तापू लागल्याने हरभजन सिंगने माफी मागितली आहे.
हरभजन सिंगने मागितली माफी
हरभजन सिंग ने X वर प्रतिक्रिया देताना लिहिले की, "इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यांना त्यावर आक्षेप आहे त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. आम्ही आणि समाजातील प्रत्येकाचा आदर करतो, हा व्हिडिओ मी शेअर केला होता. 15 दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या शरीराची स्थिती दाखवण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला होता.
आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नाही
हरभजनने पुढे लिहिताना म्हटले की, 15 दिवस खेळल्यानंतर आमचा पाय खूप दुखत होता. आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. तरीही तुम्हा लोकांना आम्ही चुकीचे आहोत असे वाटतं असेल तर, मग मी सर्वांची माफी मागतो. कृपया हे प्रकरण इथेच संपवा आणि सर्वांनी आनंदी आणि निरोगी राहा.
इतर महत्वाच्या बातम्या