एक्स्प्लोर
Advertisement
भज्जी आणि रैनाच्या लेकी मॅचची रणनीती आखण्यात गर्क
हरभजनची मुलगी हिनाया आणि सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया एकमेकींशी गप्पा मारत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दणक्यात सुरुवात झाली आहे. एकीकडे टी20 चे महामुकाबले सुरु असताना एक अत्यंत गोड फोटो समोर आला आहे. भारताचा स्पिनर हरभजन सिंह आणि सुरेश रैना यांच्या चिमुरड्या मुली एकमेकींशी गप्पा मारत असतानाचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
हरभजनची मुलगी हिनाया आणि सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया एकमेकींशी बोलण्यात गुंतल्या आहेत. हरभजनची पत्नी, अभिनेत्री गीता बसराने दोघींचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'वाघाचे बछडे पुढच्या सामन्याची रणनीती आखत आहेत' असं कॅप्शन गीताने दिलं आहे.
सोशल मीडियावर या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. धोनीची मुलगी झिवा कुठे आहे? असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. हरभजन सिंग, सुरेश रैना यांनीही हा फोटो रिपोस्ट केला आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या अकराव्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आहे. रैनासोबत यंदा भज्जही चेन्नई संघात आहे. गेली दहा वर्ष हरभजन मुंबई इंडियन्ससोबत खेळत होता, मात्र यावेळी त्याला चेन्नईने संघात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement