एक्स्प्लोर

पुण्याचा आणखी एक पराभव, गुजरातचा सात गडी राखून विजय

राजकोट: गुजरात लायन्सनं रायझिंग पुणेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला आपला पहिला विजय साजरा केला. गुजरातला पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोलकाता आणि हैदराबादकडून हार स्वीकारावी लागली होती. पण अखेर राजकोटच्या मैदानात गुजरातनं पुण्यावर बारा चेंडू आणि सात विकेट्स राखून विजय साजरा केला. या सामन्यात गुजरातच्या अँड्र्यू टायनं हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेऊन पुण्याला 20 षटकांत आठ बाद 171 धावांत रोखलं. त्यानंतर ड्वेन स्मिथ आणि ब्रेन्डन मॅक्युलमनं 93 धावांची सलामी देऊन गुजरातच्या विजयाचा पाया रचला. सुरेश रैना आणि अॅरॉन फिन्चनं चौथ्या विकेटसाठी केलेल्या 61 धावांच्या अभेद्य भागिदारीनं गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकाच दिवशी दोन हॅटट्रिक बंगळुरुचा लेग स्पिनर सॅम्युअल बद्री आणि गुजरातचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय या दोघांनीही आयपीएलच्या रणांगणात एकाच दिवशी हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला. बद्रीने मुंबईच्या डावातल्या तिसऱ्याच षटकात पार्थिव पटेल, मिचेल मॅकलेनहान आणि रोहित शर्मा यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडण्याची कामगिरी बजावली. मुंबईच्या डावात त्याच्या गोलंदाजीचं पृथःकरण होतं चार षटकं, एक निर्धाव नऊ धावा आणि चार विकेट्स. आयपीएलमध्ये हॅटट्रिक साजरी करणारा बद्री हा आजवरचा बारावा, तर अँड्र्यू टाय हा तेरावा गोलंदाज ठरला. गुजरातच्या अँड्र्यू टायने अखेरच्या षटकात पुण्याच्या अंकित शर्मा, मनोज तिवारी आणि शार्दूल ठाकूर यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर बाद केलं. पण विशेष म्हणजे अँड्र्यू टायने हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेण्याचाही पराक्रम गाजवला. पुण्याच्या डावात त्याचं पृथक्करण चार षटकं, 17 धावा आणि पाच विकेट्स असं होतं. मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. बंगळुरुने  मुंबईला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची तिसऱ्याच षटकात चार बाद 7 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि कृणल पांड्या यांनी मुंबईची पडझड होऊ दिली नाही. कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागिदारीनं मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर सात चेंडू आणि चार विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या

AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
Vaibhav Sooryavanshi:वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला     
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला
IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget