नवी दिल्ली : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देण्यात आली आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी भारत भेटीदरम्यान मोदींना ही अनोखी भेट दिली. ते सात दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत.
या जर्सीवर रोनाल्डोने स्वाक्षरीही केलेली आहे. पोर्तुलागमध्ये फुटबॉलचा विकास आणि भारतातील खेळांचा होणारा विकास यांची भागिदारी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.
पोर्तुगालच्या फुटबॉल टीमचा कर्णधार रोनाल्डो हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. त्याने चार वेळा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मिळणारा बेलोन डिओर हा पुरस्कार पटकावला आहे.