बर्लिन : बायर्न म्युनिकचा गोलरक्षक मॅन्युएल नोयाची विश्वविजेत्या जर्मनीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जर्मन फुटबॉल असोसिएशननं नोयाच्या खांद्यावर नेतृत्त्वाची धुरा सोपवत असल्याची गुरुवारी घोषणा केली.

 
बास्टियन श्वाईनस्टायगरनं 29 जुलै 2016 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. जर्मनी आणि नॉर्वे संघांत रविवारी 2018 सालच्या विश्वचषकाचा पात्रता सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यापासून नोया जर्मनीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

 
नोयानं आजवरच्या कारकीर्दीत 14 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जर्मनीचं कर्णधारपद भूषवलं आहे. जूनमध्ये झालेल्या युरो कपमध्ये नोयानं सहापैकी पाच सामन्यांमध्ये जर्मनीचं नेतृत्त्व केलं होतं.