French Open 2022: फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया (Caroline Garcia)  आणि क्रिस्टीना म्लाडेनोविक (Kristina Mladenovic) यांनी महिला दुहेरीचं विजेतेपद (Women's Doubles Title) पटकावलं. त्यांनी अमेरिकेच्या कोको गॉफ (Coco Gauff) आणि जेसिका पेगुला (Jessica Pegula) यांचा 2-6, 6-3, 6-2 फरकानं पराभव केलाय. 


कॅरोलिन आणि क्रिस्टिना जोडीचा पहिल्या सेटमध्ये उपविजेत्या गॉफ आणि पेगुला या एकेरी जोडीविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कॅरोलिन आणि क्रिस्टिना यांनी पुनरागमन करत त्यांनी सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही कॅरोलिन आणि क्रिस्टिनानं एकतर्फी विजय मिळवला. अठरा वर्षांच्या गॉफला शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत इंगा स्वियाटेककडून पराभव पत्करावा लागला होता. गॉफ आणि पेगुला पहिल्यांदाच मोठ्या दुहेरी स्पर्धेत एकत्र खेळत होत्या. तर, क्रिस्टीनाची ही सहावी ग्रँड स्लॅम महिला दुहेरी ट्रॉफी आहे, ज्यापैकी तिनं तिमा बाबोससह चार जिंकल्या आहेत.


ट्वीट-



गार्सिया आणि म्लदेनोविक जोडीनं 2016 मध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.  या स्पर्धेतील त्यांचं दुसरं ग्रँडस्लॅम ठरलं आहे. यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत दोघेही कत्रितपणे दुसरी स्पर्धा खेळत होत्या. त्यांनी दुसऱ्या फेरीत 4-0 अशी बाजी मारत सामन्यावर सुरक्षित पकड घेतली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये त्या एकत्र खेळल्या होत्या. मात्र, त्यावेळी पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.


हे देखील वाचा-