French Open 2022 Men's Final: फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक स्पेनच्या राफेल नदालनं (Rafael Nadal) जागतिक क्रमवारीत 8 क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा (Casper Ruud) पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर 22 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये राफेल नदालनं 6-3 असा विजय मिळवला. त्यानंतर राफेल नदालनं दुसरा सेट 6-3 नं जिंकला.  तर, तिसरा सेट 6-0 फरकानं जिंकून तो चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन ठरला.


राफेल नदाल रोलँड गॅरोस येथे 30 वा विजेतेपद सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचा खेळाडू राफेल नदालनं फ्रेंच ओपन 2022 जिंकून कारकिर्दीतील 22वं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत तो नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा दोन ग्रँडस्लॅम पुढं आहे. 2022 च्या फ्रेंच ओपनपूर्वी नदालनं 21 ग्रँडस्लॅम जिंकलं होतं. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांच्या नावावर 20-20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.


ट्वीट-



नदालनं 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि  2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे. तो आजपर्यंत कधीही अंतिम फेरीत पराभूत झाला नाही.


हे देखील वाचा-