Georgina Rodriguez : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) पोहोचला आहे. या क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत (Georgina Rodriguez) सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. सौदी अरेबियातील कायद्यानुसार महिला आणि पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत, मात्र रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला या कायद्यातून सूट मिळेल. पण रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना (Cristiano Ronaldo Girlfriend) हिला सौदी अरेबियामध्ये राहताना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.


रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला सौदीमध्ये पाळावे लागणार नियम


जॉर्जिना रॉड्रिग्जला (Georgina Rodriguez) रोनाल्डोसोबत (Cristiano Ronaldo) सौदी अरेबिया (Saudi Arabia) राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण तिला सौदी अरेबियातील महिलांसाठीचे नियम पाळावे लागणार आहेत. जॉर्जिनाला हे सर्व नियम पाळण्याची सवय करावी लागेल. सौदी अरेबियातील कायद्यानुसार स्त्री-पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत. पण, सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आहे, कारण रोनाल्डो सौदीचा नागरिक नाही. त्यामुळे रोनाल्डोला गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिग्जसोबत राहण्याची परवानगी आहे.


सौदी अरेबियामध्ये जॉर्जिनाची जीवनशैली बदलेल?


सौदी अरेबियात महिलांना स्वातंत्र्याच्या बाबतीत फारशी सूट नाही. सौदी अरेबिया अजूनही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी पुराणमतवादी देश आहे. युरोपिय संघ परराष्ट्र व्यवहार आणि सहकार मंत्रालयाच्या वेबसाइटवर सौदी अरेबियातील रहिवाशांनी पाळावे लागणार्‍या नियमांची यादी आहे. यानुसार, जॉर्जिना रॉड्रिग्जला तिच्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करावा लागण्याची शक्यता आहे. 


कोणकोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?



  • रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिला सार्वजनिक ठिकाणी अबाया (Abaya) (बुरख्या प्रमाणे असणारा पारंपारिक पोशाख) घालावा लागेल.

  • सौदी अरेबियामध्ये महिलांनी कपडे घालण्यासंदर्भातही काही नियम आहे, त्यामुळे जॉर्जिनालाही हे नियम पाळावा लागतील.

  • रोनाल्डो आणि जॉर्जिनाला त्यांची जीवनशैली आणि आहारात काही बदल करावे लागतील. सौदीमध्ये दारू आणि डुकराचे मांस खाण्यास सक्त मनाई आहे.

  • रमजान महिन्यात सार्वजनिक ठिकाणी खाण्यास, पिण्यास किंवा धूम्रपान करण्यास परवानगी नसेल.

  • जॉर्जिना पवित्र शहरे आणि ठिकाणांना भेट देऊ शकणार नाही. शिवाय जॉर्जिना परवानगी मिळाल्यानंतर नैसर्गिक स्थळांना भेट देऊ शकेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?