Lionel Messi: सौदी अरबचा अल हिलाल फुटबॉल क्लब लिओनल मेस्सीला साइन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी अल हिलाल कल्ब 300 मिलिअन डॉलरचा करार करण्याच्या शक्यता आहे. अल हिलाल क्लबनं लिओनल मेस्सीला आपल्या क्लबमगध्ये दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती स्पॅनिश आउटलेट Mundo Deportivo च्या रिपोर्ट्समधून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)सोबत  सौदी अरबच्या Al Nassr फुटबॉल क्लबने करार केला होता. त्यानंतर आता मेस्सीसोबत अल हिलाल फुटबॉल क्लब करार करण्याच्या तयारीत आहे. 


सौदी अरबच्या Al Nassr फुटबॉल क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)सोबत तब्बल 214 मिलिअन डॉलरचा नुकताच करार केला होता. फुटबॉल क्लबच्या इतिहासात हा सर्वात मोठ करार मानला जात होता. पण आता लिओनल मेस्सीसाठी सौदी अरबच्या अल हिलाल फुटबॉल क्लबने  यापेक्षा 100 कोटी डॉलरची रक्कम जास्त देण्याची तयारी केली आहे. स्पॅनिश आउटलेट Mundo Deportivo च्या रिपोर्ट्सनुसार, मेस्सीसोबत 300 मिलिअन डॉलरचा करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लिओनल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मन (PSG) येथे आणखी एक वर्ष राहण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तरीही, अल हिलाल पुढील उन्हाळ्यात जेव्हा करारातून मुक्त होईल तेव्हा मेस्सीसोबत करार करण्याची शक्यता आहे.


लिओनल मेस्सी यापूर्वी सौदी अरबचा पर्यटन ब्रँड अँबेसडर म्हणून काम केलेय. त्यामुळे मेस्सी आणि सौदी अरबचे चांगले संबध आहेत. याचाच फायदा घेत सौदी अरबच्या अल हिलाल या फुटबॉल क्लबने लिओनल मेस्सी याच्यासोबत करार करण्याची तयारी केली आहे. सौदी अरबच्या अल हिलाल कल्बकडून मेस्सीला 300 मिलिअन डॉलरची ऑफर देण्यात येऊ शकते. त्यामुळे हा करार झाला तर लिओनल मेस्सी आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू होऊ शकतो. 


लिओनल मेस्सी याचा पीएसजी फूटबॉलसोबतचा करार पुढील वर्षी संपुष्टात येत आहे. मेस्सीनं हा करार आणखी न वाढवण्याचा निर्णय घेतल्यास.. मेस्सीसाठी अल हिलाल या क्लबसोबतच इतर क्लबही बोली लावण्याची शक्यता आहे. यामध्ये एफसी बार्सिलोन आणि एमएलएस संघ - इंटर मियामी यांनी मेस्सीसोबत संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेस्सीनं पीएसजी सोबत करार वाढवला नाही तर अल हिलाल या क्लबपुढे इतर क्लबचं आव्हानं असणार आहे. 


 दरम्यान, पीएसजी फुटबॉल क्लबनं मेस्सी 2025 पर्यंत आपल्यासोबत असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मेस्सीनं 2025 पर्यंत सोबत असू असा शब्द दिला आहे. लवकरच आम्ही नवीन करार करु, अशी माहिती पीएसजी क्लबने दिली आहे.