IND vs PAK SAFF Championship 2023 : सुनील छेत्रीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फुटबॉलच्या मैदानात पाकिस्तानला आस्मान दाखवले. बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-० च्या फरकाने पराभव केला. या सामन्यात गरमागरमी झाली.. दोन्ही संघामध्ये चांगलाच वाद झाला होता. भारतीय पंचांना पाकिस्तानच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलेय. दोन्ही संघामध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबला होता. सामन्याच्या रेफरीने वाद संपल्यानंतर भारतीय कोचला रेड कार्ड दाखवले.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना एकतर्फी झाला. संपूर्ण सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व होते. एकादाही पाकिस्तानच्या संघाला पुनरागमन करता आले नाही. सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचला भिडले. 45 व्या मिनिटाला हा प्रसंग घडला.  पाकिस्तानी खेळाडू जेव्हा थ्रो इन घेत होते, तेव्हा भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांनी चेंडूला हात मारला.. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचसोबत भिडले. त्यानंतर भारतीय खेळाडूही आले. दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाली. 



थोड्यावेळानंतर भारत आणि पाकिस्तान संघातील हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर रेफरीने भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांना रेड कार्ड दिले. तर पाकिस्तानच्या कोचला येलो कार्ड दाखवले. तसेच भारतीय डिफेंडर संदेश झिंगन आणि पाकिस्तानचा मिड फिल्डर राहिस नबी या दोघांनाही येलो कार्ड दाखवले.


पाहा व्हिडीओ










भारताचा पाकिस्तानवर विजय -


दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. बेंगलोरमधील के श्री कांतीरावा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना रंगला. सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. 
भारतासाठी कर्णधार सुनील छेत्री या दमदार कामगिरी केली. छेत्रीने सलग तीन गोल केले. त्याशिवाय उदांता सिंह याने सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला एक गोल केला.  छेत्रीने तीनमधील दोन गोल दोन गोल पेनल्टीवर केले. पाकिस्तानच्या संघाला एकही गोल करता आला नाही.