IND vs PAK SAFF Championship 2023 : फुटबॉलच्या मैदानात आज भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांची लढत होणार आहे.  दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघाला या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होणार आहे. दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. या सामन्याबद्दल फुटबॉलप्रेमीमध्ये उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही या सामन्याची चर्चा सुरु आहे. पाहूयात हा सामना कधी आणि कुठे पाहाता येणार आहे... 


सैफ चॅम्पियनशिप 2023 ग्रुप (SAFF Championship 2023)
Group A: भारत, कुवैत, नेपाळ, पाकिस्तान
Group B: लेबनान, मालदीव, भूटान, बांगलादेश 


भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल माहिती ( IND vs PAK SAFF Championship 2023 Match Details)


भारतीय फुटबॉल संघाला सैफ चॅम्पियनशिप 2023 चा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. बुधवारी बेंगलोरमधील के श्री कांतीरावा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे.  सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेचा भारत गतविजेता आहे.   2021 मध्ये नेपाळचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. 


कुठे पाहणार भारत आणि पाकिस्तान सामना ? (IND vs PAK SAFF Championship 2023 Live Straming) 


सैफ चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी उत्सुक आहेत. सामन्याचे लाईव्ह प्रसारण टिव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवर होत आहे. त्याशिवाय मोबाईलवर लाईव्ह  स्ट्रिमिंग फॅनकोडवर (FanCode) पाहता येईल. तसेच एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही माहिती मिळेल. 


भारतीय संघाचा दबदबा -


सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आठवेळा जेतेपद मिळवले आहे.  1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये टीम इंडियाने जेतेपद मिळवलेय. मालदीवने 2008 आणि 2018 मध्ये जेतेपद मिळाले. त्याशिवाय बांगलादेशने 2003 मध्ये चषकावर नाव कोरले होते.  सध्या भारतीय संघाचे फीफा रॅकिंग 101 इतके आहे. सैफ चॅम्पियनशीपमुळे भारताला फिफा रँकिंग सुधारण्याची संधी असेल. भारतीय संघाने रविवारी भुवनेश्वर येथे लेबनान संघाला 2 -0 ने पराभूत करत इंटरकांटिनेंटल चषकावर नाव कोरले होते. पाकिस्ताविरोधात होणाऱ्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्री याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. इंटरकॉन्टिनेंटल चषकात सुनील छेत्रीने प्रभावी कामगिरी केली होती. आज होणाऱ्या सामन्यातही छेत्रीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. छेत्रीच्या नावावर आतापर्यंत ८७ गोल आहेत.