FIFA World Cup 2022, Women Referees: कतारमध्ये फिफा विश्वचषक रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांना रोमांच पाहायला मिळत आहे. पुरुषांच्या फिफा विश्वचषकात महिला रेफ्रीनं आपली भूमिका चोख बजवाली आहे. फ्रान्सची रेफ्री स्टेफनी फ्रॅपार्ट (Stephanie Freppart) हिने गुरुवारी जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यातील सामन्यादरम्यान रेफ्री म्हणून काम पाहिलं. स्टफनी फ्रॅपार्ट हिने शिट्टी वाजवताच एक नवा पराक्रम केला आहे. तिला फिफामध्ये महिला रेफ्री होण्याचा मान मिळालाय. त्याशिवाय मारिया रेबेलो या भारतीय महिला रेफ्रीनेही फिफामध्ये पंच म्हणून काम पाहिलेय. फिफामध्ये मारिया रेबेलो हिने नुकतेच रेफ्री म्हणून काम पाहिलेय. मारिया रेबेलो ही मूळची गोव्याची आहे. पुरुषांच्या आय-लीग फूटबॉल सामन्यात आणि संतोष ट्रॉफीमध्ये अंपायरिंग करणारी ती पहिली महिला आहे.


रेबेलो हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पुरुषांच्या स्पर्धेत महिला पंच म्हणून सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या नावाची चर्चा आहे. त्यामध्ये रेबेलो हिच्या नावाची चर्चा आहे. मारिया रेबेलो प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली की, फिफा विश्वचषकात रेफ्री म्हणून काम पाहणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जो आमच्यासारख्या इतर अनेक लोकांना नक्कीच प्रेरणा देईल. मी देशातील जवळपास सर्वच पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये काम पाहिलेय. पुढील काळात आणखी महिला या व्यवसायात उतरतील, असा विश्वास आहे. 


मारिया रेबेलो हिचा थक्क करणारा प्रवास - 
मारिया रेबेलो ही मूळची गोव्याची आहे. गोव्यातील कर्टोरिम येथे जन्मलेल्या रेबेलोने लहान वयातच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. 2001 मध्ये रेबेलो हिने भारतीय महिला फूटबॉल संघाचं प्रतिनिधित्व केलेय. फूटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर मारिया हिने रेफ्री या क्षेत्रामध्ये आपलं नशीब अजमावलं. मारिया 2010 पासून संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या क्लस्टर सामन्यांचे रेफ्री म्हणून काम पाहत आहे. मारियानं भारतीय महिला फुटबॉल संघाचं कर्णधारपदही भूषावलं आहे. निवृत्तीनंतर मारियानं रेफ्री म्हणून काम पाहत आहे. मारियाला आय-लीग 2013-14 च्या हंगामासाठी रेफ्रींच्या यादीत स्थान मिळालं होतं. त्याचबरोबर मारिया 2011 पासून फिफा-सूचीबद्ध रेफ्री आहे. तसेच भारतात झालेल्या सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वचषकादरम्यान, मारियानं रेफ्री मूल्यांकनकर्ता म्हणून काम पाहिले होतं. 


मारिया रेबेलो हिने 2001 मध्ये एएफसी महिला चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलेय. छोट्या करिअरनंतर मारियानं फूटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामंतर रेबेलो हिने रेफ्रीमध्ये आपले नशीब आजमावले. सुरुवातीला मारियानं गोव्याच्या स्थानिक लीगमधील पुरुषांच्या सामन्यांत रेफ्री म्हणून काम केले. त्यानंतर एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील सामने रेफ्री म्हणून काम केले. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये रेफ्री म्हणून काम केलेय. आता फूटबॉलमधील सर्वोच्च स्पर्धा असणाऱ्या फिफा विश्वचषकात मारिया रेफ्री म्हणून काम पाहत आहे.