Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेला आज दिवसभरात एकूण तीन सामने खेळवले जाणार असून मध्यरात्री 12.30 वाजताही एक सामना खेळवला जाणार आहे. आज बऱ्यापैकी सर्वच सामन्यात दमदार खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यामध्ये संपूर्ण फुटबॉल जग वाट पाहणाऱ्या रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ मैदानात उतरेल. तर ब्राझीलमधून नेमार मैदानात उतरणार आहे. उरुग्वेमधूनही सुवारेज, कवानी मैदानात उतरतील. सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा विश्वविजेता ब्राझील आज सर्बियाशी भिडणार आहे. त्याचवेळी दोन वेळा विश्वचषक विजेत्या उरुग्वेचा संघ दक्षिण कोरिया भिडणार आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा सामना घाना आणि स्वित्झर्लंडचा सामना कॅमेरूनशी होणार आहे


आज सामने होणाऱ्या संघाचा विचार करता पहिल्या सामन्यातील स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरॉनमधील स्वित्झर्लंड फीफा रँकिंगमध्ये 14 व्या तर कॅमरॉन 38 व्या स्थानावर आहे.  दुसरीकडे उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया सामन्यात उरुग्वे फीफा रँकिंगमध्ये 16 व्या तर द. कोरिया 29 व्या स्थानावर आहे. पोर्तुगाल आणि घानामध्ये फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, घानाचा संघ तब्बल 61 व्या स्थानी आहे. तर ब्राझील अव्वल स्थानी असून सर्बियाची फिफा रँकिग 25 आहे.


कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?


आज पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Ronaldo), ब्राझीलच्या नेमार ज्युनियर,उरुग्वेच्या सुवारेज या स्टार खेळाडूंवर अनेकांची नजर असेल. याशिवाय पोर्तुगाल संघात बर्नार्डो सिल्वा (bernardo silva), ब्रुनो फर्नांडीस (bruno fernandes), उरुग्वेमध्ये कवानी, ब्राझीलमध्ये थियागो सिल्वा, विनी ज्यु. यांच्याकडेही फुटबॉलप्रेमींचं लक्ष असेल.


कधी होणार सामने?


आजचा पहिला सामना स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमरॉन भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया आणि 9.30 वाजता पोर्तुगाल विरुद्ध घाना सामना होईल. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी ब्राझील विरुद्ध सर्बिया सामना रंगणार आहे. 


कुठे पाहाल सामना?


भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.



हे देखील वाचा-